भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी आपल्या उत्कृष्ट नेतृ्त्वासाठी ओळखला जायचा. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. नेतृत्वासह तो आपल्या यष्टीरक्षणासाठी देखील ओळखला जायचा.
यष्टीच्या मागे तो वाऱ्याच्या वेगाने फलंदाजाला यष्टीचीत करुन माघारी धाडायचा. मात्र इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक एलेक स्टीवर्टचं म्हणणं आहे की, इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स हा एमएस धोनीपेक्षाही फास्ट आहे.
बेन फोक्स हा इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व करतो. सध्या तो भारतीय दौऱ्यावर आलेल्या कसोटी संघाचा भाग आहे. त्याने या संघाकडून खेळताना २ स्टंपिंग आणि ६ झेल टिपले आहेत. त्याने फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या गोलंदाजीवर शानदार झेल टिपले. दरम्यान एलेक स्टीवर्ट यांनी द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘तो असं काहीतरी करतो जे कोणीच करु शकत नाही. त्याच्या हाताची गती खूप जास्त आहे. एमएस धोनीच्या हातात गती होती. मात्र बेन फोक्सची गती त्याच्याहून अधिक आहे.’ (Cricket news in marathi)
कोण आहे एलेक स्टीवर्ट?
एलेक स्टीवर्टने इंग्लंडसाठी ८२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी इंग्लंड संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली होती. त्यांनी बेन फोस्कला भारतात येण्यापूर्वी यष्टीरक्षणाच्या सरावात मदत केली होती.
हैदराबाद कसोटीत बेन फोक्सने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ओली पोपसोबत मिळून सहाव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात पोपने १९६ धावांची खेळी करुन भारतीय संघाकडून विजय हिसकावून घेतला होता. त्याने फलंदाजी करताना आणि यष्टीमागे यष्टीरक्षण करताना संघासाठी दमदार खेळ केला आहे.
राजकोटमध्ये रंगणार चौथा कसोटी सामना..
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवला. मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.