Akash Madhwal SaamTV
Sports

Legends Praised Akash Madhwal: आकाश मधवालच्या 'वादळी' गोलंदाजीनंतर ट्विटरवर 'त्सुनामी', दिग्गज क्रिकेटपटूंचेही हृदय जिंकले

Akash Madhwal Latest News : मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या विजयाचा हिरो ठरला आकाश मधवाल.

Nandkumar Joshi

Akash Madhwal Success: मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या विजयाचा हिरो ठरला आकाश मधवाल. आकाशने घातक गोलंदाजीनं लखनऊच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. अवघ्या ५ धावा देत ५ विकेट गारद केले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. आकाशच्या घातक गोलंदाजीने दिग्गज क्रिकेटपटूंची मने जिंकली. मैदानावरील आकाशच्या वादळानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांची त्सुनामी आली. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्सने लखनऊसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनऊला आकाश मधवालने पहिला झटका दिला. त्यानंतर डावाच्या दहाव्या षटकात दोन मोठे तडाखे दिले. त्याने बदोनी आणि नंतर निकोलस पुरनला बाद केले.

आकाशच्या या तडाख्यानंतर लखनऊ पुन्हा सावरलाच नाही. अखेरच्या षटकांत आकाशने बिश्नोई आणि मोहसिनला बाद करून विकेटचा पंच मारला. त्याच्या गोलंदाजीवर दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग फिदा झाला. त्याने लागलीच ट्विट करून कौतुकाचा सेतू बांधला.

कोण काय म्हणालं?

विरेंद्र सेहवागने आकाश मधवालचं तोंडभरून कौतुक केलं. आकाश मधवालने लीगच्या अखेरच्या सामन्यात चार विकेट घेतले होते. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात पाच गडी गारद केले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी बघून खूप आनंद होतो. हे पर्व असे ठरले ज्यात अनुभवी खेळाडूंची दमदार कामगिरी बघायला मिळाली आणि अनेक नवीन खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे, असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.

जसप्रीत बुमराहनेही ट्विटमधून आकाशचे कौतुक केले. आकाश मधवालचा काय स्पेल ठरला...अभिनंदन मुंबई पलटण..., असे ट्विट जसप्रीतने केले.

महान गोलंदाज अनिल कुंबळेनेही आकाश मधवालवर कौतुकाचा वर्षाव केला. हायप्रेशर गेममध्ये खूपच जबरदस्त गोलंदाजी. आकाश मधवाल, ५/५ क्लबमध्ये तुझं स्वागत!, असे कुंबळे म्हणाला.

आकाश मधवाल, काय जबरदस्त गोलंदाजी. मुंबई इंडियन्स एक असं विद्यापीठ आहे, तिथलं ग्रॅज्युएशन तुम्हाला सुपरस्टार बनवतो, असं ट्विट इरफान पठाणनं केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT