Sakshi Sunil Jadhav
आजकाल तरुणांपासून ३० ते ४० वयाच्या मुलांपर्यंत पोटाचा घेर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो.
एकदा का वजन वाढलं तर ते कमी करण्यासाठी खूप मेहनत ख्यावी लागते. त्यात पोटाचा घेर वाढला की कमी होता होत नाही. अशावेळेस काय करावं?
गोंधळून न जाता एक ठरवेली गोष्टी फॉलो करा. त्यामध्ये काही लहान सवयींचा समावेश होतो. त्याने तुम्ही वजन आणि फॅट कमी करू शकता.
सगळ्यात आधी वजन कमी करण्यासाठी तुम्ही जेवणानंतर काही सवयींमध्ये बदल केला पाहिजे. ते रुटीन तुम्ही नेहमी फॉलो केलं पाहिजे.
रात्री जेवणानंतर रोज न विसरता आणि न आळस करता चाला. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.
रात्री जेवणानंतर साधारण तासाभरानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करा. याने पचनक्रीया सुधारते. तसेच वजन कमी होतं.
रात्रीची सलग ७ तास झोप शरीराला खूप फायदेशीर असते. त्याने हार्मोनल इंम्बॅलेन्स होत नाही. याने भूकही लागत नाही.
कधीच झोप अपुरी ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. याने शरीवर वेगळाच परिणाम दिसू शकतो.
जेवढा स्ट्रेस घ्याल तेवढं तुमचं वजन वाढेल. त्यामुळे जितकं रिलॅक्स राहता येईल तितकं राहा. सकारात्मक विचार करत राहा. उत्तम जीवनशैली फॉलो करा.