Piyush Mishra: शराब, शबाब और बेवफाई...; पियुष मिश्रा यांना पत्नीची दिला धोका, स्वत: कबुल करत म्हणाले...

Piyush Mishra: पियुष मिश्रा यांनी १९९८ मध्ये "दिल से" या चित्रपटातून पदार्पण केले आणि आता ते "गँग्स ऑफ वासेपूर" सारख्या चित्रपटांमुळे घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते संगीतमय प्रवासात व्यस्त आहे आणि लवकरच "सिर्फिरा" ही एक नवीन कादंबरी लिहिणार आहे.
Piyush Mishra
Piyush MishraSaam Tv
Published On

Piyush Mishra: अभिनेता, लेखक आणि गायक पियुष मिश्रा हे त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखले जातात. ते प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे बोलतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पियुष यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि दारूच्या व्यसनाबद्दल उघडपणे भाष्य केले.

पत्नीला त्यांच्या बेवफाईबद्दलचे सत्य सांगितले

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, पियुष मिश्रा यांनी कबूल केले की त्यांनी त्यांची पत्नी प्रिया नारायणन यांना धोका दिला होता. त्यांनी सांगितले की या गोष्टीचा भार त्यांच्या हृदयावर खूप जड होता. पियुष म्हणाले, "माझ्या पत्नीला सत्य कबूल करणे खूप मोठी गोष्ट होती. मी तिला सत्य सांगण्यापूर्वी माझ्या आत एक वादळ निर्माण झाले होते, परंतु मी तिला सर्व काही सांगताच माझे मन शांत झाले."

Piyush Mishra
Dharmendra: 'भारत आणि पाकिस्तान दोघांनाही...'; 'इक्कीस'च्या सेटवरील धर्मेंद्र यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; सांगितली शेवटची इच्छा

पियुष यांनी पुढे स्पष्ट केले की त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया खूप शांत होती. ते म्हणाले, "माझ्या पत्नीने मला सांत्वन दिले आणि म्हणाली, 'ठीक आहे, तुम्ही काही चुका केल्या आणि मी काही चुका केल्या. आता आयुष्यात पुढे जाऊया." पियुषच्या मते, सत्य बोलल्याने त्यांचे मन हलके झाले आणि त्यांना खूप दिलासा मिळाला.

Piyush Mishra
Bollywood 2025: कान्स ते मेट गाला...; २०२५ मध्ये या भारतीय अभिनेत्री ठरल्या ग्लोबल फॅशन आयकॉन्स

केवळ वैयक्तिक नातेसंबंधांव्यतिरिक्त, पियुषने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दलही पश्चात्ताप व्यक्त केला. त्याने २००५ मध्ये दारू सोडण्याचा निर्णय घेतला. पियुष म्हणाला, "दारू पिणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. जर मी ते लवकर नियंत्रित केले असते तर मी आयुष्यात आणखी उंची गाठली असती. व्यसन तुमची सर्जनशीलता नष्ट करते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com