अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसचा विजय झाला आहे.
काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर यांनी भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष पराभूत केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचा भाजपला अपेक्षित फायदा झाला नाही.
जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी भाजप आघाडीवर असतानाही चिखलदऱ्यात पराभव झाला.
Amravati Local Body Election 2025 Results Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरूवातीच्या कलामध्ये महायुतीने बाजी मारल्याचे स्पष्ट झालेय. अमरावतीमध्येही भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवलाय. पण येथील चिखलदरा नगरपरिषदमध्ये लोकांनी काँग्रेसला कल दिलाय. चिखलदारामध्ये काँग्रेसच्या नदराध्यक्षपदाच्या उमेदवाराने विजय मिळवलाय. अमरावतीमधील १२ पैकी ९ जागांवर भाजपला विजय मिळवलाय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र खातेही उघडता आलेले नाही.
अमरावतीमधील चिखलदरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख अब्दुल शेख हैदर हे 461 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवंशी यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. पण चिखलदरामधील लोकांनी काँग्रेसच्या बाजूने कल दिलाय.
अमरावती जिल्ह्यात १२ पालिकेतील निवडणुकीच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार सध्या ९ जागांवर आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक एक उमेदवार आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. कोणत्या ठिकाणी काय स्थिती आहे, ते पाहूयात..
धारणी-भाजप
चिखलदरा-काँग्रेस - शेख अब्दुल शेख
अचलपूर-भाजप
चांदुर बाजार-भाजप.
मोर्शी-शिवसेना(शिंदे)
शेंदूरजना घाट-भाजप.
वरुड-भाजप.
दर्यापूर-काँग्रेस
अंजनगाव सुर्जी-भाजप
धामनगाव रेल्वे-भाजप - अर्चना रोठे विजयी
नांदगांव खंडेशवर-शिवसेना उबाठा.
अंजनगाव सुर्जी-भाजप
चांदुर रेल्वे-भाजप
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोडे यांचा विजय झाला आहे. त्या धामणगाव रेल्वे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अर्चना रोडे यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. धामणगाव नगरपरिषदेत भाजपच्या ९ नगरसेवकांनी आतापर्यंत विजयी मिळवला आहे. धाणगाव रेल्वे नगर परिषदेवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.