Akash Deep x
Sports

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

India Vs England Test : दुसऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले. मिळालेल्या संधीचे आकाश दीपने सोने केले आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 2nd Test : लीड्स सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली होती. लीड्सनंतर एजबॅस्टनमध्ये खेळण्यासाठी भारताचा संघ बर्मिंगहॅमला पोहोचला. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या ऐवजी आकाश दीपला संधी देण्यात आली. सामन्याच्या सुरुवातीला आकाश दीपला खेळवण्याबाबतच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण चांगल्या खेळीने आकाश दीपने प्रश्नांची उत्तरे दिली.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप चमकला. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने चार बळी घेतले. मोहम्मद सिराजच्या साथीने इंग्लंडने आकाश दीपने रोखले. त्यानंतर दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी दोन विकेट्स आणि पाचव्या दिवशी दोन विकेट्स घेतल्या आहेत. आकाश दीप इंग्लंडच्या उरलेल्या फलंदाजांनाही बाद करेल असे चाहते म्हणत आहेत.

कसा आहे आकाश दीपचा प्रवास?

आकाश दीप बिहारच्या सासाराम शहरातील रहिवासी आहे. क्रिकेट खेळण्यासाठी आकाश दीपला त्याच्या वडिलांचा पाठिंबा नव्हता. माझं क्रिकेट खेळणं माझ्या वडिलांना अजिबात आवडत नव्हते. त्यांना वाटायचे क्रिकेट खेळणे हा गुन्हा आहे. मी ज्या ठिकाणाहून आलोय, तेथे क्रिकेटबाबत चांगलं बोललं जात नाही, असे आकाश दीपने सांगितले होते. तरीही त्याने लपूनछपून क्रिकेट खेळणे सुरु ठेवले.

२०१५ वर्ष आकाश दीपसाठी फार कठीण होते. या वर्षी त्याच्या वडिलांचे अर्धांगवायूने निधन झाले. काही महिन्यात आकाशच्या भावाचा देखील मृत्यू झाला. अशा परिस्थितीमुळे तो तीन वर्ष क्रिकेट विश्वापासून दूर राहिला. दुर्गापूर येथे गेल्यानंतर त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचा फलंदाज ते गोलंदाज असा प्रवास सुरु झाला. त्याने आतापर्यंत त्याच्या ३८ सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १२८ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT