ajinkya rahane saam tv
Sports

Dombivali: भावविवश झालेला अजिंक्य रहाणे म्हणाला आजही माझ्या हृदयात...

खूप दिवसांनी शाळेत आल्यानं अजिंक्य रहाणे गहिवरुन गेला हाेता.

प्रदीप भणगे

डोंबिवली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) जुन्या आठवणींमध्ये रमताना दिलासा. सध्या मुलुंडात (mulund) राहणारा मुळचा डोंबिवलीकर (dombivali) अजिंक्य राहणे खूप वर्षानंतर डोंबिवलीत आला हाेता. अजिंक्यने त्याच्या एसव्ही जोशी हायस्कूलला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. (ajinkya rahane visits SV Joshi School In Dombivali)

अजिंक्य पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासमवेत शाळेत पाेहचला. त्याने राधिका आणि आर्यासमवेत मैदानात सेल्फी काढला. ज्या ठिकाणी आपण क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले त्या मैदानाला कसं विसरेन असेही ताे म्हणाला.

खरं तर मला खूप वर्षांपासून यायचं होतं. आज योग आल्याने मी खूप आनंदित झालाे आहे. इथंपासून मी क्रिकेट खेळायला प्रारंभ केला. शाळेने मला पाठिंबा व प्राेत्साहन दिले. शाळेत खूप बदल झाले आहेत इथं येणं खूप स्पेशल आहे असेही अजिंक्यने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT