Ajinkya rahane catch  twitter
Sports

Ajinkya Rahane Catch: वय फक्त आकडाच! वयाच्या 35 व्या वर्षी अजिंक्यचा तरुणांनाही लाजवेल असा कॅच; VIDEO पाहायलाच हवा

IND vs WI 2nd Test: नुकताच अंजिक्यने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Viral Catch Video: त्रिनिदादच्या मैदानावर भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात भारतीय मजबूत स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला हवी तशी छाप सोडता आलेली नाही.

फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता येत नसली तरीदेखील क्षेत्ररक्षणात तो मोलाचं योगदान देताना दिसून येत आहे. नुकताच त्याने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

अजिंक्यचा भन्नाट झेल...

अजिंक्य रहाणे ३५ वर्षांचा आहे. मात्र क्षेत्ररक्षण करत असताना तो एखाद्या युवा खेळाडूलाही लाजवेल अशी कामगिरी करत असतो. नुकताच त्याने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे. वेस्टइंडीजची फलंदाजी सुरू असताना ८७ व्या षटकात त्याने हा झेल टिपला आहे. हा झेल टिपून त्याने जर्मन ब्लॅकवूडला पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. (Ajinkya Rahane Catch)

अजिंक्य रहाणेने हा झेल रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर टिपला. हा झेल सोपा मुळीच नव्हता कारण उजव्या हाताच्या अजिंक्य रहाणेने डाव्या हाताने हा झेल टिपला आहे. हा वेस्टइंडीजचा चौथा विकेट ठरला. जर्मन ब्लॅकवूड २० धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

दोन्ही कसोटीत फ्लॉप..

अजिंक्य रहाणेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. या कामगिरीनंतर वेस्टइंडीज दौऱ्यासाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती.

डॉमिनिका कसोटीतील पहिल्या डावात त्याने अवघ्या ३ धावा केल्या होत्या. तर त्रिनिदाद कसोटीत त्याला अवघ्या ८ धावा करता आल्या आहेत. या फ्लॉप कामगिरीनंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जाऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू

Vachana Dile Tu Mala: 'वचन दिले तू मला' मालिकेत ऊर्जाची पहिली लढाई; उज्ज्वल निकमचा आशीर्वाद घेऊन उतरणार न्यायाच्या रणांगणात

BloodPressure : घरी BP नॉर्मल, डॉक्टरांकडे जाताच का वाढतो? कारणे आणि चुकीच्या सवयी समजून घ्या

Maharashtra Politics : राजकारणात चाललंय काय? काँग्रेसचा नेता झाला शिंदेसेनेचा स्वीकृत नगरसेवक

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

SCROLL FOR NEXT