Rohit Sharma Record: रोहितचा भीमपराक्रम! दुसऱ्या कसोटीत महेला जयवर्धनेचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडत बनला नंबर 1

IND vs WI 2nd Test: दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
rohit sharma
rohit sharma saam tv
Published On

IND vs WI 2nd Test Rohit Sharma New Record: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजने देखील दमदार सुरुवात केली आहे. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने मोठ्या विक्रमाच्या बाबतीत महेला जयवर्धनेला मागे सोडलं आहे. (Rohit Sharma Record In Test)

rohit sharma
IND vs WI 2nd Test: खेळाडू असावा तर असा; विराटला भेटताच या खेळाडूच्या आईला अश्रू अनावर; मिठी मारत म्हणाली.. -VIDEO

हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने मोठ्या विक्रमात श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे सोडलं आहे. रोहितने वेस्टइंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ५७ धावा चोपल्या.

यासह तो कसोटीत फलंदाजी करताना सलग सर्वाधिक वेळेस डबल डीजिट धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने कसोटीत फलंदाजी करताना सलग ३० वेळेस डबल डीजिट धावा केल्या आहेत.

असा कारनामा करणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम महेला जयवर्धनेच्या नावे होता. त्याने २९ वेळेस हा कारनामा केला होता. (Latest sports updates)

rohit sharma
IND vs WI 2nd Test: 'रेकॉर्ड्स महत्वाचे नाही,पण..', विक्रमी शतकी खेळीनंतर विराटचे मन जिंकणारे वक्तव्य

रोहित - यशस्वीच्या नावे खास विक्रमाची नोंद..

वेस्टइंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे. दोघांनी डावाची सुरुवात करताना असा कारनामा करून दाखवला आहे जो आजवर कोणालाही करता आला नव्हता.

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी कसोटीत भारतीय संघासाठी सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. त्यांनी जोरदार सुरुवात करत अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत अर्धशतकी भागीदारी केली.

भारतीय संघाने दिले ३६५ धावांचे आव्हान..

भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने दुसरा डाव २ गडी बाद १८१ धावांवर घोषित केला आहे.

या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाने २ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत. वेस्टइंडीजला शेवटच्या दिवशी विजयासाठी २८९ धावांची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com