आयपीएलचा थरार सुरु झाला असून पहिल्या सामन्यात गतविजेत्या केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला आहेत. रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी इतकी मजबूत होती की कोलकाताची गोलंदाजी त्याच्यासमोर टिकू शकली नाही.
आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी अर्धशतकं झळकावली . विराटने ५९ रन्सची नाबाद खेळी केली, तर सॉल्टने ५६ रन्सची तुफानी खेळी केली. कोलकाता टीमकडून फक्त तीन गोलंदाजांना प्रत्येकी १-१ विकेट घेता आली. या सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पराभवाची कारणं स्पष्ट केली आहेत.
अजिंक्य रहाणेने आपल्या टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट करताना म्हटलंय की, "आम्ही १३ व्या ओव्हरपर्यंत चांगले खेळत होतो. पण २-३ विकेट्सने सामन्याचं चित्र आमच्यासाठी पूर्णपणे बदललं होतं. विकेटनंतर आलेल्या फलंदाजांनी खूप प्रयत्न केलं पण त्यांना यश मिळालं नाही. जेव्हा मी आणि वेंकटेश अय्यर फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही २००-२१० च्या स्कोरचा विचार करत होतो. पण पडणाऱ्या विकेट्सने सामन्याचा मार्ग बदलला."
अजिंक्य रहाणेने नंतरच्या ओव्हर्समध्ये दव पडल्याचा उल्लेखही केला. रहाणेने पॉवरप्लेमध्ये आरसीबीने केलेल्या फलंदाजीचेही कौतुक केलं.
एकेकाळी कोलकाताने दहाव्या ओव्हरमध्ये एक विकेट गमावून १०७ रन्स केले होते. १० ओव्हरमध्ये टीमचा स्कोअर १०० च्या पुढे गेला होता. त्यामुळे टीमचा स्कोर २०० चा पार जाणं शक्य वाटत होतं. मात्र त्यानंतर केकेआरने ५ विकेट फक्त ४३ रन्समध्ये गमावले. यानंतर केकेआर १७४ रन्सपर्यंत पोहोचू शकली. शेवटच्या १० ओव्हर्समध्ये टीमला फक्त ६७ रन्स करता आले.
या सामन्यात केकेआर २०-३० कन्स जास्त करू शकली असती. त्याच वेळी केकेआरच्या पराभवाचं एक मोठं कारण म्हणजे एकदा दबावाखाली आल्यानंतर सर्व गोलंदाजांची लाईन आणि लेंथ खराब होऊ लागली. याशिवाय केकेआरला फलंदाजी सुधारणही महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.