IPL 2025 : नशीब फुटकं ते फुटकंच.. तिसऱ्या बॉलवर क्विंटन डिकॉकचा कॅच सुटला अन् पाचव्या बॉलवर लगेच आऊट

KKR VS RCB IPL 2025 : टॉस जिंकत बंगळुरूच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉकला जीवनदान मिळाले पण लगेच दोन बॉल्सनी त्याची विकेट पडली.
KKR VS RCB IPL 2025
KKR VS RCB IPL 2025 X (Twitter)
Published On

Kkr Vs Rcb : आयपीएल २०२५ ला सुरुवात झाली आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये सुरु आहे. सामन्यामध्ये रजत पाटीदारने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि सुनील नरेन मैदानामध्ये उतरले.

आरसीबीकडून जॉश हेजलवूडने गोलंदाजी करण्याला सुरुवात केली. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर हेजलवूडने टाकलेल्या बॉलवर क्विंटन डिकॉकने चौकार मारत डावाची सुरुवात केली. पुढे तिसऱ्या बॉलवर क्विंटन डिकॉकने जोरदार शॉट मारला. कॅच पकडण्यासाठी सुयश शर्मा पीचजवळ पोहोचला. त्याने कॅच पकडली पण बॉल त्याच्या हातून निसटला.

KKR VS RCB IPL 2025
Virat Shahrukh Dance Video : 'झूमे जो पठाण..' मॅचपूर्वी शाहरुख खानसोबत विराट कोहलीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

सुयश शर्माने कॅच सोडल्याने क्विंटन डिकॉकला जीवनदान मिळाले. पण लगेच जॉश हेजलवूडने टाकलेल्या पाचव्या बॉलवर क्विंटन डिकॉकची विकेट पडली. विकेटकिपर जितेश शर्माने डिकॉकची कॅच पकडून त्याला आउट केले. या एकूण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान क्विंटन डिकॉक बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. त्याने सुनील नरेनच्या साथीने चांगला खेळ केला. दोघांनी तुफानी शॉर्ट्स मारत पटापट धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे पावरप्लेमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात मिळाली. रहाणे आणि नरेन जर टिकून खेळले, तर आरसीबीवर दबाव येईल असा म्हटले जात आहे.

KKR VS RCB IPL 2025
Virat Kohli : कोहलीवरचं 'विराट' प्रेम! हातात RCB चा फ्लॅग, अंगात 18 नंबरची जर्सी; व्हिडीओ होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com