aiden markram twitter
Sports

LSG vs DC, IPL 2025: 6,4,6,4...स्टार्कला धू धू धुतलं; मार्करम- मार्शची दमदार सुरुवात -VIDEO

Mitchell Starc, IPL 2025: आयपीएल स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली आहे. मार्श आणि मार्करनमे त्याचा चांगलाच समाचार घेतला.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. गेल्या हंगामात दिल्लीचं नेतृत्व करणारा रिषभ पंत या हंगामात लखनऊकडून खेळतोय. तर दिल्लीची सुत्र अक्षर पटेलच्या हाती आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मिचेल स्टार्कची धुलाई

दोन्ही संघ या हंगामातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करत असलेल्या अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊकडून डावाची सुरुवात करण्यासाठी एडेन मार्करम आणि मिचेल मार्शची जोडी मैदानावर आली.

या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यावेळी दिल्लीकडून तिसरे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर एडेन मार्करमने बाहेर निघून कव्हर्सच्या वरुन शानदार षटकार मारला. त्यानंतर याच षटकात मार्शने चौकार, षटकार आणि पुन्हा एकदा चौकार मारला. या षटकात दोन्ही फलंदाजांनी मिचेल स्टार्कची चांगली धुलाई केली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), डेविड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिजवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT