आयपीएल २०२५ हा सिझन चेन्नई सुपर किंग्जसाठी काही फारसा चांगला झालेला नाही. मुंबई विरूद्धची पहिला सामना जिंकल्यानंतर टीमला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मुंबईविरुद्धच्या विजयानंतर चेन्नई टीम आरसीबीविरुद्ध १९७ रन्सचा पाठलाग करू शकला नाही. रविवारी झालेल्या राजस्थान विरूद्धच्या सामन्यात देखील त्यांना पुन्हा पराभव स्विकारावा लागला. दरम्यान या पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणेची आठवण झाली.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड गेल्या सिझनपर्यंक ओपनिंगला येत होता. मात्र आता तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. ओपनिंग जोडी बदलल्यापासून अजून चेन्नईला चांगली सुरुवात मिळालेली नाही. रचिन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी यांच्या जोडीला अजून खास कामगिरी करता आलेली नाही
यानंतर ऋतुराज म्हणाला की, गेल्या काही वर्षांपासून अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर खेळतोय त्याच्यानंतर अंबाती रायुडू फलंदाजीला यायचा. म्हणून आम्हाला वाटलं की, एक पाऊल पुढे टाकणं हा एक चांगला निर्णय असेल. राहुल त्रिपाठी आक्रमक भूमिका बजावतोय. तरीही, फारसा फरक दिसला नाही. त्यामुळे माझी फलंदाजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरमध्येच येते.
गायकवाड पुढे म्हणाला की, मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. लिलावाच्या वेळीच हे ठरवण्यात आलं होतं. मला कोणतीही अडचण नाही आणि मी रिस्क घेऊ शकतो. तर गरज पडल्यास मी स्ट्राइक रोटेट करू शकतो आणि जोखीम घेण्यास आणि मोठे फटके मारण्यासही तयार आहे.
राजस्थान रॉयल्सने नितीश राणाच्या ८१ रन्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना १८२ रन्स केले. यानंतर प्रत्युत्तरा दाखल, चेन्नईला शेवटच्या सहा चेंडूमध्ये २० रन्सची आवश्यकता होती. मात्र यावेळी धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि ११ चेंडूत एका चौकार आणि एका सिक्सच्या मदतीने फक्त १६ रन्स काढू शकला. धोनीनंतर टीमसाठी कोणीही जिंकण्यासाठी काहीही करू शकलं नाही. ज्यामुळे सीएसके २० ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावून केवळ १७६ रन्स करू शकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.