rohit sharma  twitter
Sports

Team India Captaincy: रोहितनंतर हा खेळाडू होणार वनडे संघाचा कर्णधार? स्टार खेळाडूचं नाव तुफान चर्चेत

Team India ODI Captain: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरू आहे. या सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली गेली असून, जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यावरून हे स्पष्ट होतंय की, रोहित आता यापुढे कसोटी संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता खूप कमी आहे. टी -२० क्रिकेटला रामराम करणाऱ्या रोहितकडून आता वनडे संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो

who will replace rohit sharma as captain in odi

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या वनडे संघाचा कर्णधार का व्हायला हवा? हार्दिक हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे संघाचं नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे.

यापूर्वीही त्याने लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे रोहितने जर वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार केली, तर हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रोहितने टी-२० क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील स्टार फलंदाज आहे. त्यामुळे तो टी-२० संघाचा कर्णधार म्हणून बेस्ट ऑप्शन आहे.

त्याला वनडे संघात आपलं स्थान निर्माण करण्यात आलेलं नाही. त्यामुळे रोहितची रिप्लेसमेंट म्हणून सूर्यकुमार यादवकडे पाहिलं जाणार नाही. शेवटी हार्दिक पंड्या हाच पर्याय शिल्लक राहतो.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला रोहितची रिप्लेसमेंट हवी आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात होणार आहेत. पण भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान रोहितच्या नेतृत्वाबाबत चर्चा झाली, तर हार्दिक पंड्याचं नाव सर्वात पुढे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT