T20 world cup 2026 saam tv
Sports

T20 world cup 2026: पॅट कमिंसनंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक मोठा धक्का; वर्ल्डकपपूर्वीच हा खेळाडू बाहेर

Australia player ruled out World Cup: पॅट कमिन्सच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच टीममधील एक महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उद्यापासून क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी-२० च्या स्पर्धेला सुरुवात होणार चाहते देखील उत्सुक आहेत. दरम्यान २०२६ च्या टी२० वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आधीच बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा गेमचेंजर खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरणार आहे. यापूर्वी पॅट कमिंन्सच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया धक्का बसला होता. तर आता जोश हेझलवूडच्या रूपात कांगारूंना दुसरा धक्का बसला आहे.

पॅट कमिन्सनंतर जोश हेझलवूडला दुखापतीमुळे टी-२० वर्ल्डकपमधून माघार घ्यावी लागली आहे. मिचेल स्टार्कने आधीच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. अशातच आता कमिन्ससह हेझलवूडची दुखापत ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा धक्का आहे.

जोश हेझलवूडला हॅमस्ट्रिंगची दुखापत

१२ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्पर्धेत शेफील्ड शिल्डमध्ये जोश हेझलवूडला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. तेव्हापासून तो एकही सामना खेळलेला नाही. तो अ‍ॅशेस सिरीजमध्ये खेळू शकला नव्हता. या आठवड्यात टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन टीम श्रीलंकेत आली तेव्हा हेझलवूड सिडनीमध्ये होता. कोलंबोमध्ये आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्याच्या फक्त पाच दिवस आधी सिलेक्टर टोनी डोडमेड यांनी सांगितलं की, जोश हेझलवुड या स्पर्धेपर्यंत फीट होणार नाही.

जोशच्या जागी टीममध्ये कोणाची लागणार वर्णी?

जोश हेझलवूड २०२६ च्या टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ पर्यंत फीट होईल, असं सिलेक्टर्सना वाटत होतं. मात्र त्याची दुखापत बरी व्हायला अजून काही काळ लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने हेझलवूडच्या जागी टीममध्ये कोणाचा समावेश होणार याबाबत अजून माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वापरताय? या 5 सिक्रेट ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून, मैत्रिणींसोबत चॅटिंगची डबल मज्जा येईल

Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण

Ola-Uber Strike: उद्या रिक्षा आणि कॅब राहणार बंद, ओला- उबरचालकांचा देशव्यापी संप ; VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड

Black Blouse Saree: काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर कोणत्या रंगाची साडी सूट होईल?

SCROLL FOR NEXT