abhishek sharma yuvraj singh video call twitter
क्रीडा

Abhishek Sharma:शतकी खेळीनंतर अभिषेक शर्माने 'गुरू' युवराज सिंगला केला व्हिडिओ कॉल! काय चर्चा झाली? पाहा VIDEO

Ankush Dhavre

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला आहे. यासह या मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. ४७ चेंडूत आपलं शतक पूर्ण करणारा अभिषेक शर्मा या सामन्यातील सामनावीर ठरला आहे. आपल्या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. शानदार खेळीनंतर त्याचा १ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अभिषेक शर्माच्या खेळीनंतर बीसीसीआयने त्याचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात तो आपला गुरु आणि आवडता खेळाडू युवराज सिंगला व्हिडिओ कॉल करताना दिसून येत आहे. सुरुवातीला त्याने आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना व्हिडिओ कॉल केला.

त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर अभिषेकने युवराज सिंगला व्हिडिओ कॉल केला. काही सेकंदातच युवराजने कॉल उचलला आणि अभिषेकशी संवाद साधला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

अभिषेक शर्माला घडवण्यात युवराज सिंगचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे पहिलं शतक झळकावल्यानंतर अभिषेकने युवराजला कॉल केला. यावेळी युवराजने त्याचं कौतुक केलं. अभिषेकने सांगितलं की, ज्यावेळी तो शून्यावर आऊट झाला त्यावेळीही युवराजने त्याचं अभिनंदन केलं होतं. या व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं,तर कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३४ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने नाबाद १०० धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव १३४ धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT