abhishek sharma batting :  Saaam tv
Sports

अभिषेक शर्माचं झंझावाती वादळ; मोदी स्टेडियमवर चौकार-षटकारांचा वर्षाव, 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं

abhishek sharma batting : अभिषेक शर्माचं झंझावाती वादळ पाहायला मिळालं. मोदी स्टेडियमवर अभिषेकने चौकार-षटकारांचा वर्षाव केला.

Vishal Gangurde

टी20 वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारताची चांगली सुरुवात

अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत ५१ धावा कुटल्या

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची सलामी जोडी ठरली दमदार

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टी२० वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माच्या जोडीने तुफानी फलंदाजीने सामन्याला सुरुवात केली आहे. या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने १८ चेंडूत ५१ धावा कुटल्या आहेत. अभिषेक शर्माच्या धुव्वादार खेळीचं भारतीयांकडून कौतुक होत आहे.

सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली आहे. अभिषेक शर्माने दोन षटके सावध खेळल्यानंतर तिसऱ्या षटकानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. आक्रमक फटकेबाजी करत किवी गोलंदाजांची लट बिघडवून टाकल्याचे दिसून आलं. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत वर्ल्डकपमधील २००९ सालचा विक्रम मोडला.

टी२० विश्वकप २०२६ फायनलच्या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपळली. मागील काही सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेर काढण्याचं मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात होती. परंतु टीम मॅनेजमेंटकडून अभिषेक शर्मावर पुन्हा विश्वास दाखवला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने पॉवरप्लेचा फायदा घेतला. अभिषेकला एक जीवनदान देखील मिळालं. अभिषेक शर्माने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

संजू सॅमसनही चमकला

टी२० विश्वकप २०२६ फायनलच्या सामन्यात संजू सॅमसनही चांगली फटकेबाजी केली. त्यानेही मैदानात चौकार आणि षटाकारांचा वर्षाव केला. अभिषेक शर्मानंतर संजू सॅमसननेही अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने संघाला चांगली सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT