Abhishek Sharma breaks Rohit Sharma 35 ball century record saam tv
Sports

अभिषेक शर्मा नावाचं वादळ! ठोकलं सर्वात वेगवान शतक; सोशल मीडियावर शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा

Abhishek Sharma Breaks Rohit Sharma’s Record : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ३० चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. भारतीय फलंदाजाच्या सर्वात वेगवान टी२० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.

Bharat Jadhav

  • अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ३० चेंडूत शतक ठोकले.

  • भारतीय फलंदाजाचा सर्वात वेगवान T20I शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला

  • अभिषेकने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने वादळी फलंदाजी करत क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माने फक्त 30 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील अनेक मोठे जागतिक विक्रम मोडीत काढला. त्यानंतर अभिषेक शर्मानं अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याच्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

अभिषेक शर्माने 9 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकाराच्या जोरावर शतक पूर्ण केलं. यावेळी त्याची स्ट्राईक रेट तब्बल 333.33 इतका होता. अभिषेक शर्माचे हे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले आहे. या शतकासह तो कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलाय.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान शतक आहे. अभिषेकनं रोहित शर्माचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय. रोहित शर्माने 2017 मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूंत शतक झळकावले होते, ज्याचा रेकॉर्ड आता अभिषेकने आपल्या नावावर केला आहे. शतकानंतरही त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. अभिषेक 34 चेंडूंत 108 धावा करून बाद झाला. या ऐतिहासिक डावात त्याने एकूण 9 चौकार आणि 11 षटकार मारले. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने त्याची विकेट काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा 'रुद्रावतार', 'इंदिरा इज बॅक', सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

राहुल गांधींचे बेधडक आंदोलने, आता पर्यंत किती अन् कोणते गुन्हे दाखल? प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल'

Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

SCROLL FOR NEXT