abhishek sharma rohit sharma  twitter
क्रीडा

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने मोडला हिटमॅनचा मोठा रेकॉर्ड! दुसऱ्याच सामन्यात बनला 'सिक्सर किंग'

Ankush Dhavre

युवा फलंदाज अभिषेक शर्माला आतापर्यंत केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र या २ सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली आहे. भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत नाबाद १०० धावांची खेळी केली.

पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीका केली गेली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत त्याने सर्वांची बोलती बंद केली. यादरम्यान त्याने रोहित शर्माचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि मालिकेत १-१ ची बरोबरी साधली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली.

रोहित शर्माला सोडलं मागे

अभिषेक शर्माने या डावात गेल्या सामन्याची चांगलीच कसर काढली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. या सामन्यापूर्वी २०२४ मधील टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी होता. मात्र अभिषेक शर्माने ८ षटकार खेचत रोहित शर्माला या रेकॉर्डमध्ये मागे सोडलं आहे. रोहित शर्माच्या नावे यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये ४६ षटकार मारण्याची नोंद आहे. तर अभिषेक शर्माने आतापर्यंत ५० षटकार खेचत अव्वल स्थान गाठलं आहे. ४५ षटकार मारणारा विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर ४१ षटकार मारणारा शिवम दुबे चौथ्या स्थानी आणि ३३ षटकार मारणारा रजत पाटीदार या यादीत पाचव्या स्थानी आहे.

२०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज

अभिषेक शर्मा- ५० षटकार

रोहित शर्मा- ४६ षटकार

विराट कोहली- ४५ षटकार

शिवम दुबे- ४१ षटकार

रजत पाटीदार - ३३ षटकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT