Abhishek Sharma: उधारीच्या बॅटने केली कमाल! टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाकडून बॅट घेऊन अभिषेक शर्माने ठोकलं शतक

Abhishek Sharma Bat Story: भारतीय संघातील युवा फलंदाज अभिषेक शर्माने भारतीय संघातील स्टार फलंदाजाकडून बॅट घेऊन आपलं शतक पूर्ण केलं.
Abhishek Sharma: उधारीच्या बॅटने केली कमाल! टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाकडून बॅट घेऊन अभिषेक शर्माने ठोकलं शतक
abhishek sharmatwitter
Published On

अभिषेक शर्मा हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद आणि दुसऱ्याच सामन्यात शानदार शतक. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात त्याने सलामीला फलंदाजीला येत विक्रमी शतक झळकावलं आहे. दरम्यान हे शतक त्याने शुभमन गिलकडून मागून घेतलेल्या बॅटने झळकावलं आहे. याचा खुलासा त्याने BCCI ने शेअर केलेल्या व्हिडिओतून केला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर अभिषेक शर्माने आपल्या बॅटबद्दल मोठा खुलासा केला. त्याने सांगितलं की ज्या, बॅटने त्याने शतक पूर्ण केलं ती बॅट शुभमन गिलची होती. शुभमन गिलकडून बॅट घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ नव्हती. याआधीही त्याने शुभमन गिलच्या बॅटने शानदार खेळ्या केल्या आहेत. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करतात. यासह २०१८ मध्ये झालेल्या आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतही दोघे भारतीय संघाकडून खेळले होते.

Abhishek Sharma: उधारीच्या बॅटने केली कमाल! टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाकडून बॅट घेऊन अभिषेक शर्माने ठोकलं शतक
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

अभिषेक शर्माने या सामन्यात ४७ चेंडूंचा सामना करत १०० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तो शून्यावर माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार कमबॅक केलं आहे. या विजयासह भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे.

Abhishek Sharma: उधारीच्या बॅटने केली कमाल! टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाकडून बॅट घेऊन अभिषेक शर्माने ठोकलं शतक
IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

अभिषेक शर्माच्या शतकी खेळीसह ऋतुराज गायकवाड ने ४६ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने २२ चेंडूंचा सामना करत ४८ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २३४ धावा जोडल्या या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि झिम्बाब्वेचा डाव १३४ धावांवर आटोपला यासह भारतीय संघाने १०० धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com