Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight saam tv
Sports

LSG vs SRH: अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठीमध्ये मैदानातच राडा; अंपायर-ऋषभ पंतलाही भांडण आवरेना, पाहा Video

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: सोमवारी लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार राडा पहायला मिळाला. या भांडणाने टोकाचा निर्णय घेतला होता. यावेळी ऋषभ पंत यांनालाही हस्तक्षेप करावा लागला.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल पुन्हा खेळवण्यात येत असून सोमवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यामध्ये एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. या दोन्ही खेळाडूंचा वाद थांबवण्यासाठी अंपायरना हस्तक्षेप करावा लागला, तरीही दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची होत राहिली.

या दोन्ही खेळाडूंमधील हे भांडण इतकं वाढलं परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सर्व खेळाडूंनी मध्यस्ती केली. ऋषभ पंतनेही यावेळी त्याच्या टीमच्या गोलंदाजाला मागे खेचलं आणि त्याला शांत केले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव केला.

दिग्नेश आणि अभिषेकमध्ये का झाला वाद?

लखनऊचे इतर गोलंदाज महागडे ठरत असताना दिग्वेश राठी किफायतशीर सिद्ध होत होता. त्याने ८ व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अभिषेक शर्माला आऊट केलं. अभिषेकने २० चेंडूत ५९ रन्स केले होते. या विकेटनंतर, दिग्वेश राठीने त्याचं नोटबुक सेलिब्रेशन केलं. ज्यासाठी त्याला दोनदा दंडही ठोठावण्यात आला होता. दरम्यान या सेलिब्रेशनपूर्वी दिग्वेशने अभिषेकला बाहेर जाण्याचा इशारा केला होता आणि यामुळे अभिषेक संतापला होता.

दोघांच्याही भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचा सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि यावेळी अभिषेक गोलंदाजाकडे परत येऊ लागला. दिग्वेशही त्याला सतत काहीतरी बोलत होता. त्याच्यासोबतचे खेळाडू त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान ऋषभ पंत आला आणि त्याने दिग्वेशला मागे खेचलं आणि समजावलं.

सामन्यानंतर दोघांनीही केलं हस्तांदोलन

यापूर्वी अभिषेक शर्माने रवी बिश्नोईच्या ओव्हरमध्ये सलग ४ चेंडूत ४ सिक्स लगावले होते. सामना संपल्यानंतर, दिग्वेश आणि अभिषेक यांनी एकमेकांशी हातही मिळवला होता. यावेळी त्यांच्यात काही संवाद झाला. बीसीसीआयचे उपाध्यक्षही त्या दोघांशी चर्चा करताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT