Ajinkya Rahane and Rahul Dravid viral video saam tv
Sports

Ajinkya Rahane: गुरु-शिष्याचा अनोखा स्नेह! द्रविडसाठी अजिंक्य रहाणेचं मन जिंकणारं पाऊल; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Ajinkya Rahane and Rahul Dravid viral video: बुधवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि अनुभवी अजिंक्य रहाणे एकत्र दिसत आहेत. रहाणेने आपल्या गुरूबद्दल असलेली निष्ठा आणि सन्मान या व्हिडिओत प्रभावीपणे व्यक्त केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल सुरु झाली असून ६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृ्त्वाखाली केकेआरने ८ विकेट्सने सामना जिंकला. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सने आयपीएल २०२५ मध्ये आपला पहिला सामना गमावला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात केकेआरने बाजी मारली आणि सामना जिंकला.

दरम्यान बुधवारच्या या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड एकत्र दिसतायत. व्हिडिओमध्ये रहाणेने गुरूचा आदर कसा करावा हे दाखवून दिलं आहे. रहाणे आणि द्रविड यांच्यातील हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

रहाणे-द्रविडचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओमध्ये २०१३ चे काही क्षण देखील दाखवण्यात आले आहेत. ज्यामध्ये अजिंक्य रहाणे राहुल द्रविडच्या शॉटचे कौतुक करताना दिसतोय. त्यावेळी रहाणे राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. तर आता रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे आणि राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच राहुल द्रविडच्या पायाला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होतं.

रहाणेच्या कृत्याचं होतंय कौतुक

द्रविड पायाला प्लास्टर लागलंय त्यामुळे द्रविडला आधाराशिवाय चालता येत नाही. या सामन्यात तो कुबड्यांच्या मदतीने चालताना दिसला. इतकंच नाही तर मैदानात तो व्हीलचेअरवरून फिरतानाही दिसला. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये, रहाणेने राहुल द्रविडला व्हीलचेअरवर पाहताच, तो प्रथम त्याच्याकडे धावत गेला. रहाणेने द्रविडशी हँडशेक केलं. मुख्य म्हणजे यावेळी रहाणे द्रविडशी बोलताना गुडघ्यांवर बसला.

गुरुप्रति खास आदर

रहाणे राहुल द्रविडशी बोलत असताना द्रविड व्हीलचेअरवर बसला होता. गुरूला आपल्याशी बोलण्यासाठी डोकं वर करावं लागतंय हे कदाचित हे आवडलं नाही, म्हणून त्याच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी रहाणं द्रविडसमोर गुडघे टेकून बसला. रहाणेचा हा आदर पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT