ban vs ned google
Sports

T-20 World Cup, Super 8: सुपर 8 चे 7 संघ ठरले! एका स्थानासाठी बांग्लादेश अन् नेदरलँडमध्ये लढत; कोणाचं पारडं जड

T-20 World Cup Super 8 Fixtures: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत जाणारे ७ संघ ठरले आहेत.

Ankush Dhavre

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला असून साखळी फेरीतील सामने आता समाप्त होणार आहेत. तर लवकरच सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करणारे ७ संघ ठरले आहेत. तर १ स्थानासाठी २ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान कोणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना ४ गटात विगागलं गेलं आहे. या चारही गटात प्रत्येकी ५-५ संघांचा समावेश आहे. अ गटात भारत आणि अमेरिकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर ब गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. क गटातून यजमान वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर ड गटातून दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ चं तिकीट मिळवलं आहे. तर बांग्लादेश आणि नेदरलँडपैकी एका संघाला सुपर ८ चं तिकीट मिळणार आहे.

कोणाला मिळणार सुपर ८ चं तिकीट?

बांग्लादेश आणि नेदरलँड या दोन्ही संघाचा शेवटचा सामना शिल्लक आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत. ४ गुणांसह बांग्लादेशचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर नेदरलँडचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. बांग्लदेशने जर शेवटच्या सामन्यात विजय मिळवला, तर सहज सुपर ८चं तिकीट मिळेल. मात्र जर नेदरलँडला सुपर ८ फेरीत जायचं असेल, तर शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. यासह बांग्लादेशच्या पराभवासाठी प्रार्थना देखील करावी लागणार आहे. दोन्ही संघांचे गुण जर समान राहिले, तर उत्तम नेट रनरेट असलेला संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल.

या स्पर्धेत नवख्या संघांचा बोलबोला पाहायला मिळाला आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पाकिस्तानचा संघ अ गटात होता. या गटातून खेळताना पाकिस्तानला अमेरिका आणि पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

SCROLL FOR NEXT