At Matunga Dadarkar Ground 52 Year Old Cricketer Jayesh Savla Dies After Hitting Ball On His Head Saam Tv News
Sports

Cricketer Jayesh Savla Death: धक्कादायक! एकाच वेळी सुरु होते २ सामने; मुंबईत क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटपटूचा मृत्यू

Cricketer Jayesh Savla Died at the Age of 52 In Mumbai: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे.

Ankush Dhavre

Cricketer Jayesh Savla Death In Matunga:

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना ५२ वर्षीय व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे. क्रिकेटच्या मैदानावर एकाच वेळी अनेक सामने सुरु असताना हा अपघात झाला आहे.

जयेश सावला हे क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या सामन्यातील फसंदाजाने मारलेला बॉल हा त्यांच्या डोक्याला जाऊन लागला. चेंडू लागताच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबईतील माटुंगा येथील दादरकर मैदानावर सोमवारी (८ जानेवारी) एकाच वेळी दोन सामने सुरु होते. हे दोन्ही टी-२० सामने एकाच स्पर्धेतील होते. कुटची विसा ओखल विकास लेंजड कप असे या स्पर्धेचे नाव आहे. या स्पर्धेत ५० वर्षांवरील लोकांनी सहभाग घेतला होता. मुंबईतील बहुतांश मैदानांवर एकाच वेळी अनेक सामने सुरु असतात त्यामुळे खेळाडूं दुखापतग्रस्त होण्याच्या घटना सुरु असतात.मात्र चेंडू लागुन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. (Latest sports updates)

चेंडू लागल्यानंतर जयेश मैदानावरच पडले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने त्यांच्या नातेवाइंकासह संघातील सहकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT