Mumbai Rickshaw Union: रिक्षा भाडे वाढणार? मुंबईचे रिक्षावाले हाय कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत

Mumbai Rickshaw Union News: मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे पहिल्या दीड किमीसाठी 23 वरून 25 करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनने केली होती, त्यासाठी डिसेंबर महिन्याची मुदत सरकारला दिली होती, पण सरकार कडून कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे मुंबईचे रिक्षावाले आता हाय कोर्टात जाणार आहेत.
Mumbai Rickshaw Union
Mumbai Rickshaw UnionSaam Digital
Published On

Mumbai Rickshaw Union

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे पहिल्या दीड किमीसाठी 23 वरून 25 करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनने केली होती, त्यासाठी डिसेंबर महिन्याची मुदत सरकारला दिली होती, पण सरकार कडून कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे मुंबईचे रिक्षावाले आता हाय कोर्टात जाणार आहेत. खटूआ समितीच्या फॉर्म्युला नुसार ग्राहक मूल्य निर्देशांक, रिक्षा विकत घेण्याचा खर्च, रिक्षांची डागडुजी करण्याचा खर्च, विमा आणि विविध कर लक्षात घेऊन रिक्षाचे भाडे ठरवण्यात येते.

ऑक्टोबर 2022 मध्ये रिक्षा भाडे 21 वरून 23 रुपये करण्यात आले होते, मात्र आता 23 वरून 25 रुपये व्हावे अशी मागणी आहे .ही मागणी एमएमआरटीए कडे करण्यात आली आहे, मात्र त्यावर सरकार कडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही, सोबत नवीन आरटीओ दंड, रिक्षा स्टँडची कमतरता, आधीची अर्धवट राहिलेली आश्वासने घेऊन रिक्षामेन्स युनियन हाय कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष थंपी कुरियन यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Rickshaw Union
KDMC RERA Scam: रेरा फसवणूक प्रकरण, बिल्डरांपाठोपाठ केडीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com