Vaibhav Suryavanshi celebrates his 78-ball century against Australia U19, rewriting Indian youth cricket history at just 14. saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Vaibhav Suryavanshi Century in Australia : अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तुफानी इनिंग खेळली आहे. फक्त ७८ बॉलमध्ये शतक ठोकून इतिहास रचला आहे.

Nandkumar Joshi

  • अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात तुफानी शतक

  • फक्त ७८ चेंडूंमध्ये शतक झळकावून रचला विक्रम

  • शतकी खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश

भारताची अंडर १९ टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची 'शानदार, जबरदस्त आणि जिंदाबाद' सुरूवात झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा यूथ ODI सीरीजमध्ये ३-० ने धुव्वा उडवून इतिहास रचला. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघानं मोठे विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन्ही संघ पहिल्याच यूथ टेस्टमध्ये समोरासमोर आले आहेत.

ब्रिस्बेनच्या इयान हिली ओव्हलवर हा सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अंडर १९ चा संघ ९१.२ ओव्हरमध्ये २४३ धावांवर गारद झाला आहे.

भारताची दमदार सुरुवात

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावानंतर भारतीय अंडर १९ चे फलंदाज मैदानात उतरले. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रे याच्यासोबत डावाची सुरुवात चांगली केली. दोघांनी पाच ओव्हरमध्येच ४७ धावा कुटल्या. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे हा माघारी परतला. पण सूर्यवंशीचा तडाखा सुरूच होता. १० व्या षटकात विहान मल्होत्रा देखील स्वस्तात तंबुत परतला. पण वैभवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली.

वैभवने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तडकावलं पहिलं शतक

वैभव सूर्यवंशीने १५ व्या ओव्हरमध्येच फक्त ३८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतर ३० व्या षटकात आपलं शतक पूर्ण केलं. वैभवने आधी षटकार आणि त्यानंतर चौकार तडकावून फक्त ७८ चेंडूंत शतक ठोकलं. या तुफानी खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. अवघ्या १४ वर्षांच्या वैभवने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिलं शतक तडकावून इतिहास रचला.

या शतकी खेळीत वैभव सूर्यवंशी याने भारत अंडर १९ कडून यूथ टेस्टमध्ये सर्वाधिक १३ षटकार ठोकण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्याने आयुष म्हात्रेच्या ९ षटकारांचा रेकॉर्डही मोडला. वैभवने तुफानी शतकाच्या जोरावर भारतीय अंडर १९ संघाला ३० षटकांत २०० धावांचा टप्पा पार करता आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT