10 rupaye ka dhakkan hardik bhai dhakkan gujarat titans fans trolled hardik pandya video viral  instagram
क्रीडा

Hardik Pandya Viral Video: दस रुपये का मख्खन.. हार्दिक भाई ढक्कन' गुजरातच्या फॅन्सकडून पंड्या ट्रोल- Video व्हायरल

Ankush Dhavre

IPL , Hardik Pandya Viral Video:

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाल्यापासून त्याला ट्रोल केलं जात आहे. गेल्या १० हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता. मात्र त्याला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहते रोहित रोहितच्या घोषणा देताना दिसून आले. दरम्यान हार्दिक पंड्याच्या विरोधात देखील घोषणा दिल्या, ज्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात क्रिकेट चाहते हार्दिक पंड्याला ट्रोल करताना दिसून येत आहेत. छोटे चाहते, ' दस रुपये का मख्खन.. हार्दिक भाई ढक्कन' अशा घोषणा देत आहात. तर रोहितला समर्थन करत मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या. ज्यावेळी हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माची भेट झाली त्यावेळी देखील हार्दिक पंड्याला ट्रोल केलं गेलं.

मुंबईचा पराभव..

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनने ४५ धावांची खेळी केली.

गुजरातने पहिल्या डावात १६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ९ गडी बाद १६२ धावा करता आल्या. हा सामना मुंबई इंडियन्सला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला २०१३ नंतर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT