Shukra Gochar 2024 saam Tv
आध्यात्मिक

Shukra Gochar 2024: सिंह राशीत शुक्र ग्रहाचं संक्रमण; ३ राशींवर होणार परिणाम, अनेकांना येणार आर्थिक अडचणी

Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीतील बदलाचा काही राशींवर अनुकूल परिणाम होतो. तर इतरांवर प्रतिकूल परिणाम देखील होतो. सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या 3 राशींवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे, हे पाहू.

Bharat Jadhav

जुलै महिन्याच्या शेवटी शुक्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहाच्या राशीच्या बदलाचा परिणाम बहुतेक राशींवर सकारात्मक असणार आहे. पण तीन राशींसाठी हा काळ अडचणींचा ठरणार आहे. शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या तीन राशींच्या जातकांनी पैशाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास जीवनात गरिबी येऊ शकते. या तीन राशी कोणत्या आहेत. या राशींचे लोकांच्या जीवनावर कोणते नकारात्मक परिणाम होऊ शकतात? हे जाणून घेऊया.

मेष

सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल म्हणजेच अडचणींचं ठरणार आहे. सिंह राशीतील शुक्राचा तुमच्या करिअर, व्यवसाय आणि नोकरीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. पैशाचा ओघ कमी होऊ शकतो. संपत्तीत नुकसान होऊ शकतं. अचानक मोठ्या खर्चामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर होऊ शकते. त्यामुळे राहणीमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काही जातकांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात अडचणी वाढतील. कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

कर्क

सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठीही डोक्याला ताप देणारं ठरणार आहे. तुमच्या स्वभावात नकारात्मकता वाढू शकते. उत्पन्नाचे स्रोत थांबू शक्यता आहे. त्यामुळे जीवनात आर्थिक संकट वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. पदोन्नती थांबण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे नातेसंबंध आणि प्रेम जीवनावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समस्या वाढण्याची शक्यता आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण अडचणीचं ठरणार आहे. सिंह राशीतील शुक्राचे संक्रमणामुळे अनेक गोष्टी मनाविरोधात होणार आहेत. बिझनेस प्लॅनवर काम सुरू करण्यास कुटुंबातून विरोध होऊ शकतो. तुमची पत्नीही तुमच्या विरोधात असू शकते. पैशाची आवक कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवनातील समस्या वाढू शकतात. नातेवाईकांशी मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. शिक्षण व्यवसायाशी संबंधित लोकांचे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता या काळात आहे. व्यवसायात नवीन बदल केल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सतत भांडणं होण्याची चिन्हे आहेत. होणाऱ्या वादामुळे नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Barfi Recipe : मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री बर्फी, आताच नोट करा रेसिपी

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला खिंडार! थोपटे, धंगेकरांनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, भाजपचे कमळ घेणार हाती

Maharashtra Live News Update: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल

Solapur : सोलापुरात मोठा राडा; मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, नेमकं काय घडलं? VIDEO

Beed Narayangad: महंत शिवाजी महाराजांचा नारायणगडाच्या ट्रस्टींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT