Shravana Nakshatra google
आध्यात्मिक

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Astrological Nakshatra : श्रवण नक्षत्रातील व्यक्ती कष्टाळू, भावनिक, भक्तीभाव असलेली असून पाणी व श्रमाशी संबंधित कामात यशस्वी होतात. सर्दी, सांधे दुखणे, आणि पचनसंस्थेचे त्रास जाणवू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

श्रवण -

या नक्षत्राचे चारही चरण मकर राशी मध्ये आहेत. चंद्र या ग्रहाच्या अंलाखाली येणारे नक्षत्र आहे. या लोकांचा स्वभाव काहीसा चंचल, शाशंक मनस्थिती, हसरा, विनोदी, हास्यविनोद करणारे, सहनशील, काहीसे चिडके, कधी संकुचित वृत्ती, तर मध्येच लोकांचा मोठ्या मनाने विचार करणारे असतात. त्यामुळे धरसोड वृत्तीची व्यक्ती म्हणून लोक बोल लावतात.

इच्छाशक्ती मात्र जबरदस्त, उत्साही, मातृ-पितृ भक्त, पाण्याच्या संबंधित कामाची आवड असते. देवाला मानणारे, दूरदृष्टी असणारे, व्यवहारी, समयसूचक, काही वेळा नाहक हट्टीपणा करताना दिसतात. निश्चय केल्यास मात्र निभवून नेतात. शनीच्या राशीमुळे कष्टाळू, दगदग सहन करणारे, शोधक वृत्ती, काहीसे धीमे, पण कष्टाने स्वकर्तुत्वाने नेटाने पराक्रम करणारे असतात. कामात गुंतवून ठेवून त्यात रममान पण ते काम जर पूर्ण झाले नाही तर चिडचिड करणारे असतात. शारीरिक कष्ट पेलवणारी शरीर यष्टि असते.

नोकरी - व्यवसाय -

या नक्षत्राच्या व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमान असतात. वकीली क्षेत्र, लहान कारखानदार, श्रम आणि कष्ट करणारा मेहनती वर्ग, धान्य - तेलाचे व्यापारी, पाण्याचे संबंधित व्यवसाय वा नोकरी, वातानुकूलित सामानाचे व्यापारी, दुरुस्ती करणारे, आईस्क्रीम तयार करणारे, विहीर पंपसेट, ट्यूबवेल, कृत्रिम पाणीपुरवठा करणारे, कोळी, प्लंबर, भूमीखाली काम करणारे, खंदक -सुरुंग लावणारे व त्याचे व्यापारी, पाणबुडी चालवणारे, सिंचन पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी असू शक्यता. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी सामाजिक किंवा आरोग्य विषयक कार्यक्रम हाती घेतल्यास श्रम आणि मेहनत घेण्याची मानसिक तयारी असून उत्तम प्रकारे पार पाडू शकतात.

रोग व आजार -

या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्दी, मुरणारी सर्दी, रेंगाळणारी सर्दी, त्यामुळे होणारे त्वचेचे रोग, गुडघे सांधे दुखणे, ही सर्दी खूप मुरली तर क्षय, दमा, ताप येण्यापर्यंत त्रास होऊ शकेल. साथीचे रोग, अतिसार, पचनशक्ती कमजोर होणे, वात कफ आणि पित्त एकदम बिघडणे अशा गोष्टी होऊ शकतात.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT