Shivsena BJP
Shivsena BJP 
सरकारनामा

घाटकोपरमध्ये लसीकरण केंद्रावरुन शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

जयश्री मोरे

घाटकोपर : कोरोनाला Corona रोखण्यासाठी मुंबईत Mumbai मोठ्या प्रमाणत लसीकरण सुरू आहे. यासाठी आता पालिका प्रशासन ठिकठिकाणी नवी लसीकरण केंद्र उभारत आहेत. मात्र यामध्ये वारंवार श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

घाटकोपर मध्ये वारंवार शिवसेना Shivsena आणि भाजप BJP श्रेयवादावरून समोरासमोर ठाकत आहेत. घाटकोपरच्या भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात Hospital आजपासून पालिकेचे नवे कोरोना लसीकरण Corona Vaccine Centre केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी शिवसेना Shivsena आणि भाजपचा BJP श्रेयवादाचा सामना रंगला होता. या केंद्रावर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या प्रयत्नाने हे केंद्र सुरू होत असल्याचे फ्लेक्स लावले होते. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

सकाळी या केंद्राचे शिवसेनेने उद्घाटन करीत लसीकरण सुरू केले. तर भाजप पदाधिकारी देखील त्यानंतर या ठिकाणी दाखल होऊन इथली पाहणी करत होते. यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र सुदैवाने कोणताही वाद झाला नाही. War of Credit Between Shivsena and BJP in Mumbai

या अगोदर देखील घाटकोपरच्या साईनाथ नगर येथील रमाबाई ठाकरे लसीकरण केंद्राचे शिवसेनेने उदघाटन केल्यावर भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा उदघाटन केले, यामुळे मुंबई मनपाच्या निवडणुका Election जश्या- जश्या जवळ येतील तसा या दोन्ही पक्षात असाच श्रेयवाद रंगताना दिसण्याची चिन्ह आहेत. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT