Sandipan Bhumare
Sandipan Bhumare 
सरकारनामा

संदीपान भुमरे यवतमाळचे नवे पालकमंत्री

वैदेही काणेकर

मुंबई : संजय राठोड Sanjay Rathod यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळच्या पालकमंत्री पदावर राज्याचे रोहयो मंत्री  संदीपान भुमरे Sandipan Bhumare यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray यांनी यंवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून भूमरे यांची  नियुक्ती केली. Sandipan Bhumare New Guardian Minister of Yavatmal

पुण्याची टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण Pooja Chavan हिच्या मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या काळात केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे राठोड अधिकच अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाचोड ग्रामपंचायतीवर सहाव्यांदा निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनलचे सर्वचे सर्व सदस्य विजयी झाले होते. 

१९८८ मध्ये पाचोड येथे शिवसेनेची Shivsena शाखा स्थापन करत संदिपान भुमरे यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८९मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड, १९९२मध्ये पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीचे उपसभापतिपद मिळवले. १९९३ मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

SCROLL FOR NEXT