Pune Unlock
Pune Unlock 
सरकारनामा

असे असेल उद्यापासून पुणे शहर 'अनलाॅक'

साम टिव्ही ब्युरो

पुणे : कोरोना Corona बाधितांचा दर आणि आॅक्सिजन बेडचा वापराचे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने पुणे Pune शहराचा समावेश दुसऱ्या ऐवजी तिसऱ्या टप्‍प्यात झाला. मात्र, शहरात सुरू असलेल्या सध्याच्या निर्बंधांचा विचार करता तिसऱ्या टप्‍प्यातील नियमावली व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आहे. Pune City Unlocking from Monday 

यामध्ये विकेंड लॉकडाऊन Lock Down कायम असला तरी सोमवार ते शुक्रवार दुकाने खुली रहाण्याची वेळ सकाळी सात ते दुपारी चार अशी केली आहे. खासगी कार्यालय, हॉटेल, पीएमपी बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. सायंकाळी ५ नंतर शहरात संचारबंदी लागू होईल. हे नियम सोमवारपासून (ता. ७) लागू होणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी हे आदेश काढले. New Rules for Unlocking in Pune 

महापालिकेने १ जूनपासून शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले. त्यामुळे बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरू रहात होती व दुपारी तीन वाजता संचारबंदी लागू होत होती. मात्र आता राज्य सरकारने शनिवारी मध्यरात्री जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार पुणे महापिलकेचा समावेश तिसऱ्या टप्प्यात येत आहे. New Rules for Unlocking in Pune Pune City Unlocking from Monday 

महापालिकेच्या निर्बंधापेक्षा सरकारचे नवे नियम नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. दुकानांची वेळ व संचारबंदीची वेळ यात दोन तास वाढविण्यात आले आहेत.

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सुरू होतील, सलून, स्पा आणि ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. खेळाची मैदाने, उद्याने देखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. बॅंका, वित्तीय संस्थाचे काम आठवडभर नियमित वेळेत सुरू असणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशात नमूद केले आहे. New Rules for Unlocking in Pune announcded

पीएमपी सुरू, मॉल नाट्यगृहे बंद
लॉकडाऊनमुळे पीएमपी पुढे आर्थिक संकट निर्माण झालेले असताना आता शासनाच्या नव्या आदेशानुसार बस सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळणार आहे. तर  चित्रपटगृह, मॉल, नाट्यगृह येथे संसर्गाचा धोका जास्त असल्याने हे अद्याप बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Pune City Unlocking from Monday 

असे आहेत पुण्यासाठी नवे नियम
- अत्यावरश्‍यक सेवेतील दुकाने आठवडाभर सकाळी सात ते दुपारी चार  
- अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहतील
-  मद्यविक्रीचा दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत खुली रहातील.
-  रोज सायंकाळी पाच वाजता शहरात संचारबंदी लागू होईल
-  हॉटेल, रेस्टोरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू
-  शनिवार- रविवार हॉटेल मधील पार्सल सेवा
- लोकल सेवा केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने, सायकलीग - पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली
- खासगी कार्यालये सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचारी क्षमता सुरू होतील.
- आऊटडोर क्रिडांगणे - सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९
- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमास सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थितीस मान्यता
- ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभाना मान्यता
- अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीत मान्यता
- शासकीय बैठका, सहकार बैठका, स्थायी समितीसाठी ५० टक्के उपस्थितीची मान्यता- रहाण्याची सोय आहे अशा बांधकाम प्रकल्पावर दुपारी ४ पर्यंत काम करण्याची मुभा
- शेती विषयक कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत करता येतील.
- जिम, सलून, ब्युटी पार्लर - ५० टक्के क्षमतेने सुरू, एसी बंद ठेवावा लागणार
- सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने केवळ बसून
- ई कॉमर्स नियमित वेळेत सुरू राहिल
- मला वाहतूक नियमित वेळेत सुरू राहिल
- आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाही, मात्र, पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात प्रवासासाठी ई- पास अनिवार्य .
-अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर नियमित वेळेत सुरू राहातील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पर्यटन मंत्री गिरीश महाजन झाले आजोबा; मुलगी श्रेया यांनी दिला बाळाला जन्म

Video: राऊतांच्या आडून जयंत पाटलांची खेळी? विशाल पाटलांसमोरच विलासराव जगपात यांचं सांगलीत मोठं वक्तव्य!

Rashmika Mandanna: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या रुपाचं चांदणं पडलंय...

Nasim Khan News: 'थोडी हिंमत दाखवा आणि संधीचा फायदा घ्या!' MIMची खुली ऑफर नसीम खान स्वीकारणार?

Naseem Khan: काँग्रेसची भूमिका छळाची, ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नाही; नसीम खान कडाडले

SCROLL FOR NEXT