Shivsena , Uddhav Thackeray , Government Formation
Shivsena , Uddhav Thackeray , Government Formation 
सरकारनामा

सेना करणार सत्तास्थापनेचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

कोणा कोणाची झाली चर्चा
भाजपने पुरेशा संख्या बळा अभावी सत्ता स्थापनेस नकार दिला. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. परंतु, शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच आज सकाळपासून उद्धव ठाकरे यांनी बहुमताची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये शरद पवार, सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांची भेट घेऊन जवळपास 55 मिनिटे चर्चा केली. 

दिल्लीतही खलबतं
दुसरी कडे शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर दिल्लीत दाखल झाले असून, ते काँग्रेसचे थिंक टँक असलेल्या अहमद पटेल यांच्याशी चर्चा करत आहेत. सत्ता स्थापनेत काँग्रेस सहभागी होणार की नाही यावरून उत्सुकता आहे. काँग्रेस पाठिंबा देईल. पण, थेट सत्ता स्थापनेत नसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या दोन्ही पक्षांशी चर्चा झाल्यानंतर शिवसेना सायंकाळी पाचच्या सुमारास सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सभागृहातील नेते दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: shiv sena to claim for government in maharashtra today
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Sahil Khan News | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

Health Tips: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 'या' फळांचे करा सेवन

Amit Shah Fake Video: आरक्षणाबाबत अमित शहांचा बनावट व्हिडिओ; दिल्ली पोलिसांनी तेलंगणाच्या सीएमला पाठवला समन्स

SCROLL FOR NEXT