Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला SSPMS ग्राउंडवर होणार सभा

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (29 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर.
Live Marathi Batmya in (29 April 2024) | Latest Update on IPL 2024, Lok Sabha Election, PM Modi, VBA, Pune, Mumbai and Overall Maharashtra
Live Marathi Batmya in (29 April 2024) | Latest Update on IPL 2024, Lok Sabha Election, PM Modi, VBA, Pune, Mumbai and Overall MaharashtraSaam TV

Rahul Gandhi: पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधींची पुण्यात सभा होणार आहे. ३ मे ला संध्याकाळी सहा वाजता Sspms ग्राउंडवर सभा होणार आहे.

PM Modi In Pune : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

पुण्यातील सभा संपून पंतप्रधान मोदी आज पुण्यात मुक्काम करणार आहेत. पंतप्रधान मोदी राजभवनवर पोहोचले आहेत. पुण्यातील रस्त्यांवर पोलिसांची चोख सुरक्षा आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता मोदी हेलिकॉप्टरने माळशिरसकडे प्रस्थान करणार आहेत.

गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरात रस्त्यावरील चिकन शॉर्मा खाऊन 16 नागरिकांना विषबाधा झाली.यातील 13 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.अजूनही 3 जणांवर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर पालिकेकडून रस्त्यावरील अनधिकृत आणि अवैध खाद्य स्टॉल हटवण्यास सुरुवात झाली असून पालिकेच्या आरोग्य खाते, परवाना आणि अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

- आदित्य ठाकरे यांचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

-उद्या ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत

- सकाळी 10 वाजता रोड शो केला जाणार असून सकाळी 11.30 उमेदवारी अर्ज भरला जाईल

- यानंतर हेलिकॉप्टरने आदित्य ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दीना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत

- दुपारी 12.30 वाजता विक्रोळी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे

जळगावमध्ये ५ अपक्ष उमेदनवारांची निवडणुकीतून माघार

- माघारीच्या शेवटच्या दिवशी जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून पाच अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार

- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि बहुजन समाज पार्टी या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात

- महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात होणार प्रमुख लढत

पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा

- ⁠महायुतीच्या चार उमेदवारांसाठी मोदी घेत आहेत सभा

- ⁠पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमधील लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा

- ⁠पुण्यातील रेस कोर्स मैदानावर होणार मोदींची सभा

- ⁠मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला राहणार उपस्थित

- मोदींच्या सभेला ⁠चार ही उमेदवार उपस्थित राहणार

- ⁠चार मतदार संघासाठी संयुक्त सभा होत असल्याने सभेला मोठी गर्दी होणाची शक्यता

राज्यातील २ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- राज्यातील २ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- महेंद्र कल्याणकर - विभागीय आयुक्त, कोकण यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई या पदावर करण्यात आली

- पी.वेलारसू यांची नियुक्ती विभागीय आयुक्त, कोकण विभाग या पदावर करण्यात आली

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

- सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

- चारही आरोपींना सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयात करण्यात आलं हजर

- विक्की गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापन यांना ८ मे पर्यंती पोलिस कोठडी

- तर सोनू चांदेर याची तब्बेत खराब असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली

- आज या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली

- दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाला मोक्का लावण्यात आला

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात अपघात, ४ जण जखमी 

- पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात अपघात

- मार्केट यार्डमधील आई माता मंदिराजवळ घडली घटना

- टेम्पो मधील लोखंडी रोल गाडीतून खाली पडला

- रोल रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरील तीन ते चार दुचाकीस्वार जखमी

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'

- वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह "रोड रोलर"

- पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

- मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये केला प्रवेश

- आज निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल केलं

- वसंत मोरे यांचं अधिकृत चिन्ह आता "रोड रोलर"

पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

- पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा

- 3 मे रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी राहुल गांधी पुण्यात

- पुण्यातील SSPMS कॉलेजच्या मैदानावर होणार राहुल गांधी यांची सभा

- सभा स्थळाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पाहणी

- नाना पटोले यांनी घेतला मैदानाचा सविस्तर आढावा

मालवणी दारुकांड प्रकरणी ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता

- मालवणी दारुकांड प्रकरणी ४ आरोपी दोषी

- याप्रकरणातील उर्वरित 10 आरोपींची निर्दोष मुक्तता

- या घटनेच्या ९ वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

- दोषींना काय शिक्षा होणार यावर 6 मे रोजी होणार निर्णया

- २०१५ मध्ये मालवणी दारुकांड प्रकरण घडले होते

- विषारी दारू पिऊन १०६ जणांचा झाला होता मृत्यू

अमित शाह एडीटेड व्हिडीओ प्रकरणी एकाला अटक 

- अमित शाह एडीटेड व्हिडीओ प्रकरण

- आसामच्या गुवाहटीमधून रितम सिंह नावाच्या व्यक्तीला अटक

शांतीगिरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी नाहीच?, अजय बोरस्ते यांची माहिती

- शांतीगिरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी नाहीच?

- शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची माहिती

- उमेदवारीबाबत शांतीगिरी महाराज यांच्याशी कोणतीही चर्चा नाही

- त्यांनी महायुतीला पाठिंबा देण्यासाठी मी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती

- शिवसेना उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील

- आजपर्यंत नाशिकमध्ये उमेदवार कोण असणार यावर निर्णय झालेला नाही

- कोणीही अफवा पसरू नये, आमचे नेते अधिकृतपणे उमेदवार जाहीर करतील

मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा

- मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा

- हवामान विभागाने दिला इशारा

- मुंबईत आज 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान

- रविवारीसुद्धा मुंबई, ठाणे, रायगड भागात अधिक तापमानाची नोंद

- तापमान सरासरीपेक्षा 4.8 अंशांनी अधिक

- एप्रिल महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेची लाट

नागपूरनंतर गोव्यातील विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

- गोव्यातील दाबोलिम विमानतळ उडवून देण्याची धमकी

- विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी

- धमकीनंतर विमानतळावर वाढवण्यात आली सुरक्षा

- गोवा विमानतळ हे लष्कराच्या अखत्यारीत

- ई-मेल बाबत गोवा पोलिसांकडून तपास सुरू

नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीचा मेल आल्याने खळबळ

नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडविण्याची धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. देश भारत आज अनके विमानतळावर धमकीचा मेल आले आहेत. धमकी मिळाल्यानंतर तपासणी केली जात असून यात काही मिळून आल्यास रियल ड्रिल असेल. सध्या ड्रिलच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.

PM मोदी सोलापूरमध्ये दाखल

Solapur Loksabha: महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज सोलापूरमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

Narendra Modi : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची पुण्यात सभा

अमित ठाकरे साडेतीन वाजता पुण्यात दाखल होणार

पाच वाजता ठिकाणी अमित ठाकरे रवाना होणार

मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे प्रथमच पुण्यातील नरेंद्र मोदीच्या सभेत उपस्थित असणार

Nanded : नांदेड बाजार समितीत हळदीची आवक वाढली

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नव्या हळदीची आवक वाढली आहे. दररोज 2 हजार हळदीचे कट्टे या बाजार समिती मध्ये विक्रीसाठी येत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीची सर्वाधिक आवक वाढली आहे. हळदीला 18 हजार 700 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळतोय. य हळदीला चांगला भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आहेत.

Nashik News : नाशिकमध्ये शांतिगीरी महाराज यांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज?

शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरताना शिंदे गटाकडून अर्ज भरल्याची माहीती. शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार असणारा का? याबाबत प्रश्नचिन्ह. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा नाही.

lok sabha Election : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकर यांचा नकार

घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस होती आग्रही

आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती

काँग्रेस मराठी की गुजराती उमेदवार देणार याकडे लक्ष

पियुष गोयल यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी

Accident News: हर्सूल सावंगी रस्त्यावर अपघात, एक महिला जागीच ठार

हर्सूल सावंगी रस्त्यावर अपघात, एक महिला जागीच ठार.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हर्सूल सावंगी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा तोल सुटून ती महिला जमिनीवर कोसळली. पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने तिला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Lok Sabha Election : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ दिवस शिल्लक

उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे चार दिवस शिल्लक

अद्याप महायुती व शिवसेनेकडून उमेदवार घोषित नाही

दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम, ठाणे, पालघर व नाशिक जागेचा तिढा अद्याप कायम

पाचव्या टप्प्यतील उमेदवारी अर्ज भरायला शुक्रवारपर्यंत मुदत

मात्र बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी

त्यामुळे चारच दिवस अर्ज दाखल करण्यास मुदत

ठाकरे गट मुंबईत चार जागा लढवत असताना फक्त दोनच जागा शिंदे गटाला मिळाल्या, तर ठाकरे गटाचं पारडं जड होण्याची शिंदे गटाला भीती

Nashik News : नाशिकमधून शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून अपक्ष अर्ज दाखल करणार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. गंगा पटांगण येथे जमलेल्या त्यांच्या असंख्य समर्थकांना मार्गदर्शन केल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. राजकारणाचा शुद्धीकरण करण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. कोणत्याही परिस्थिती माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक सुरु झाली आहे.

Rajan Vichare : ठाकरे गटाचे राजन विचारे आज लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे काही वेळातच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिशाळावर अनेक कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली आहे.

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

EDच्या अटके विरोधात दाखल केली होती याचिका

झारखंड उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण केली आहे, मात्र अद्याप निर्णय दिलेला नाही.

कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली होती

सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी ईडीने केली आहे अटक

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठासमोर होणार सुनावणी

Yavatmal : यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, घरांचे मोठे नुकसान

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पार्डी परिसरात रात्री एकच्या सुमारास वारे व मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि मोठमोठी झाडे पडली आहेत.

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

शिवसेना भवनमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, मुंबईतील उमेदवार उपस्थित राहणार

संविधान वाचवण्यासाठी सर्व लोकशाही आंबेडकरवादी संघटना, सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभा उद्या दादरमधील शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

सभेला महाविकास आघाडी पक्षांतील प्रमुख नेते आणि मुंबईतील सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

सभेत 'कृती कार्यक्रमावर व्यावहारिक सूचना आणि अंमलबजावणी' कशी करावी, याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

सभेला शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, अर्जुन डांगळे, भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी, विद्या चव्हाण, मधु मोहिते, श्याम गायकवाड, उदय नारकर, प्रकाश सोनावणे, सुभाष लांडे, मौलाना नदीम, राजेंद्र कोरडे, राखी जाधव, संध्या गोखले, प्रीती मेनन, इरफान इंजिनीअर, सुधाकर सुराडकर, सुनील खोब्रागडे, प्रभाकर नारकर, मौलाना बुमाई हसनी, संध्या म्हात्रे, फैजुलला खान, शंकर बगाडे, शाकीर शेख, श्वेता दामले आदी उपस्थित राहणार आहेत.

Raj thackeray : राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता

मनसे प्रमुख राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता

४ मे रोजी राज ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा होऊ शकते; कार्यकर्त्यांची माहिती

रत्नागिरीमध्ये मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतल्यानंतर आता स्वतः राज ठाकरे सभा घेऊ शकतात

येत्या एक-दोन दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या सभेसाठीचा दौरा निश्चित होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com