Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

Jalna Helicopter emergancy Landing: हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जालना : मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तपोवन तांडा भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेने हे हेलिकॉप्टर जात होतं. या हेलिकॉप्टरमध्ये एका पायलटसह 2 कर्मचारी होते. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहितीही समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com