सरकारनामा

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट

साम टीव्ही

कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या वादावर पडदा पडण्याची धूसर शक्यताही दिसत नाहीये. एकिकडे परीक्षांवरुन राजकारण जोरात असतानाच, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावलीय. मंत्रालयात राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  चर्चा करणार आहेत.  महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना परीक्षा घेणं शक्य आहे का? य़ाची चाचपणी या बैठकीत घेतली जाईल.  त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतंय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले. गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना विषाणू संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा विरोध आहे...अंतिम वर्ष परिक्षा पूर्णपणे रद्द करणे अव्यवहार्य असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचना सर्व विद्यापीठांसाठी स्वाभाविकपणे बंधनकारक आहेत, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदा निर्यातीच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Onion Export News | कांदा निर्यातीला परवानगी, शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया

Diabetes Tips : या चटणीचे करा सेवन मधुमेह होईल छुमंतर; पाहा रेसिपी

Watermelon Peel: कलिंगडच्या फेकल्या जाणाऱ्या सालीपासून बनवा गोड टूटी फ्रूटी

Parenting Tips: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालकांनी मुलांसोबत 'असा' वेळ घालवा

SCROLL FOR NEXT