Onion Export News | कांदा निर्यातीला परवानगी, शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय.

Onion Export News | काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर भारत सरकारने 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला काहीच दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. आता बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्यात आलीये. यावर शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया दिलीये. "सगळ्यात जास्त कांदा ज्या महाराष्ट्रात निर्माण होतो त्या राज्यातील शेतकरी जेव्हा कांदा निर्यात बंदी उठवा असं म्हणत होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मतदानावर परिणाम होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com