Maratha Reservation Agitation
Maratha Reservation Agitation 
सरकारनामा

मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर मधून आज मराठा क्रांती मोर्चाची एक मशाल पेटवली जात आहे. सकाळी दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आजच्या या मूक आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मराठा समन्वयक आलेले आहेत. Mahartha Reservation Agitation to Start Today

दंडावर काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात येणार आहे. काळा मास्क, काळे कपडे घालून आंदोलनस्थळी यावे असे आवाहन या आंदोलनाचे प्रवर्तक खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. 

हे देखिल पहा

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी संभाजीराजे यांनी १६ जून पासून मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा केली होती. सर्व पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं होतं. १६ जूनला पहिला मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँगमार्च काढण्यात येणार आहे. 

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरुन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आजपर्यंत सहन केलं आता सहन करणार नाही, आमच्याकडं फक्त आंदोलनाचा पर्याय उरला आहे, असं सांगत मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाला वेठीला धरू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. Mahartha Reservation Agitation to Start Today

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील 10 वाजता आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. खासदार धैर्यशील माने आंदोलस्थळी दाखल झाले आहेत.मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात उपस्थित होणाऱ्या लोकप्रतिनिधींशी संयमाने वागण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. Mahartha Reservation Agitation to Start Today

दरम्यान, दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाभरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर आंदोलकांचा नोंदी ठेवण्यात आले आहेत. यासाठी शेकडो पोलीस झटत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

SCROLL FOR NEXT