सरकारनामा

आजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध आजपासून शिथिल होत आहेत Unlock. त्यासाठी राज्यातल्या जिल्ह्यांची विभागणी पाच गटांत करण्यात आली आहे. Know Your District And City for New Phase of Lock Down

शासनाच्या आदेशानुसार आता मुंबई Mumbai, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक Nashik , पुणे Pune, पिंपरी चिंचवड PCMC , औरंगाबाद Aurangabad , सोलापूर आणि नागपूर  महापालिकांचे स्वतंत्र युनिट असेल. तेथिल महापालिका प्रशासनाला आपल्या भागासाठी वेगळी नियमावली काढण्याची मुभा आहे. 

ज्या ठिकाणी कोरोना पाॅझिटिव्हीचा दर रेट हा पाच टक्क्यांपेक्षा आहे आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट व आॅक्सिजन बेड यानुसार पाच गट करण्यात आले आहे. Know Your District And City for New Phase of Lock Down

पहिला गट - 

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काही सेवांवरील निर्बंध वगळता (उदा.बससेवा) पूर्णतः रद्द करण्यात आलेला आहे. Maharashtra Unlock Process to be started in Five Phases 

दुसरा गट

मुंबई शहर. यात लोकल आणि बससेवा वगळता सर्व (माॅल, रेस्टाॅरंटसह) खुले होईल. नगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार हे जिल्हेही याच गटात आहेत. Know Your District And City for New Phase of Lock Down

काय सुरु राहणार- 

- रेस्टाॅरंट ५० टक्के क्षमतेने
- मॉल्स आणि सिनेमगृह ५० टक्के क्षमतेने
- सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्णतः सुरु
-  सर्व प्रकारची बांधकामे सुरु
- शेतीविषयक कामे पूर्ण क्षमतेने 
- ई सेवा पूर्ण क्षमतेने
- जिम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने

तिसरा गट

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे

काय सुरु- काय बंद

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत व अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू (अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवारी बंद)
- मॉल्स आणि सिनेमागृह बंद
- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली (दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू) शनिवार आणि रविवार पूर्ण बंद 
- सकाळी 5 ते 9 यावेळेत सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सुरू 
- खासगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीत
- इनडोअर खेळ पूर्ण बंद
- सिनेमा चित्रीकरण फक्त स्टुडिओमध्येच
- सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजेपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीने परवानगी
-लग्न सोहळे ५० जण, अंत्यसंस्काराला २० जणांना परवानगी
- शेतीविषयक कामे आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामे दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार
- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी Know Your District And City for New Phase of Lock Down 

चवथा गट

पुणे व पिंपरी चिंचवड वगळता पुणे आणि राजगड जिल्हा

काय बंद काय सुरु - 

-  सोमवार ते शुक्रवार दुकाने स. ७ ते दुपारी २ उघडी राहणार
- सिनेमागृह, मॉल बंद
- हॉटेलमधील फक्त पार्सलला परवानगी
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ या वेळात सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक यांना परवानगी
-  अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालये २५ टक्के उपस्थितीने सुरु
-  शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थिती
-  सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ या वेळात आउट डोअर स्पोर्टस्ला 
-  सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
- लग्न सोहळ्यासाठी २४ व अंत्यसंस्कारसाठी २० जणांना परवानगी
- राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के क्षमतेने 
-  कामगारांच्या राहण्याची सोय असेल्या ठिकाणची बांधकामे सुरु राहणार 
-  शेती विषयक कामांना सोमवार तेे शुक्रवार दुपारी २ पर्यंत परवानगी
-   अत्यावश्यक सेवेसाठी ई काॅमर्स सुरू राहील
-  सलून आणि जीम एसी बंद ठेऊन ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
-  बसेस ५० टक्के क्षमतेने. फक्त बसण्याची व्यवस्था
-  संचारबंदीचे नियम कायम

पाचवा गट - वर नमूद केलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य जिल्हे 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT