Uddhav Thackeray announces Extenstion of Lock Down
Uddhav Thackeray announces Extenstion of Lock Down 
सरकारनामा

Breaking राज्यातला लाॅकडाऊन १५ जून पर्यंत वाढवला

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : ''दुसऱ्या लाटेवर Corona Second Wave आपण नियंत्रण आणतो आहोत. पण नाईलाजानं हे निर्बंध वाढवावे लागत आहेत. काही जिल्ह्यांत निर्बंध Restrictions शिथिल होतील, काही जिल्ह्यांत अधिक कडक करावे लागतील,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज जाहीर केले. Cm announces extension of Lock Down in Maharashtra till 15 June  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या Maharashtra जनतेशी सोशल मिडियाद्वारे Social Media संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही, त्यामुळं रस्त्यावर उतरण्याची भाषा करु नका, तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ नका, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यानंतर जनतेशी संवाद साधला. गेल्या महाराष्ट्र दिनी त्यांनी संवाद साधला होता. एका महिन्यात नेमके कुठे आहोत, ही संपूर्ण माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. आपण बंधनं पाळत आहात. आठ दहा दिवसांपूर्वी एक वादळ किनारपट्टीला स्पर्श करुन गेलं. हे भीषण चक्रीवादळ होते. पण नशिबाने फक्त स्पर्श करुन गेलं. Cm announces extension of Lock Down in Maharashtra till 15 June  

निर्बंध लादण्यासारखे दुःख नाही. गेल्या वेळी पेक्षा खूप फरक पडला आहे. आज १८ हजार रुग्ण सापडले आहेत. पण गेल्या लाटेत जो सर्वोच्च आकडा होता त्याच्या जवळपास चार पाच दिवसांपूर्वीची संख्या होती. त्यावेळी सक्रीय रुग्ण ३ लाख होते. यावेळी २६ मे रोजी जवळपास तेवढेच होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे चांगले आहे. 

ठाकरे म्हणाले, ''आपण कडक लाॅकडाऊ केलेला नाही. पण निर्बंध लावतो आहोत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. ही काळजीची गोष्ट आहे. शहरात कमी होताना दिसते आहे तर ग्रामीण भागात हलक्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. या वेळचा व्हायरस वेगळा आहे. त्याचा संसर्गाचा वेग प्रचंड आहे. रुग्ण बरे व्हायला वेळ लागतो आहे. यावेळी रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता दीर्घकाळ राहिली.'' Cm announces extension of Lock Down in Maharashtra till 15 June  

''पुढची पावलं सावधपणे टाकावी लागणार आहेत. आता म्युकरमायकोसिसचं नवं संकट आलं आहे. त्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतो आहोत.आपल्याला कोविडवर मात करायची आहे. आता काही गोष्टी जाणीवपूर्वक करावी लागतील. एकदा निर्बंध लावायचे एकदा शिथिल करायचे हेच चावीवाल्यासारखं मला करत बसावं लागेल. हे चांगले नाही. लाॅकडाऊन असला तरी अर्थचक्र सुरु राहिलं पाहिजे. 'कोरोनामुक्त गाव' हे प्रत्येकाने ठरवले तर राज्य कोरोनामुक्त होऊ शकतो. हा निश्चय करत नाही तोपर्यंत उघडझाप करावी लागेल,'' असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.  
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

SCROLL FOR NEXT