Chatrapati Sambhaji Raje Appeal to Naxals
Chatrapati Sambhaji Raje Appeal to Naxals 
सरकारनामा

नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात या...संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन!

जयेश गावंडे

मुंबई : मराठा समाजाला Maratha Community नक्षलवाद्यांनी Naxal भावनिक पत्रक काढून आवाहन केले होते. त्या सर्व नक्षल संघटनांना प्रती आवाहन करून खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje यांनी सुद्धा भावनिक आवाहन केले आहे. Chatrapati Sambhaji Raje Appeal to Naxal unions

छत्रपती शिवरायांचा Chatrapati Shivaji Maharaj वंशज आणि मराठा समाजाचा घटक या नात्याने संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांनाच लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

हे देखिल पहा

या पत्रात संभाजीराजे म्हणतात,''छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो की नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात." Chatrapati Sambhaji Raje Appeal to Naxal unions

''भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी Dr. Babasaheb Ambedkar या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा,'' असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

''मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च आदी मार्ग आम्ही स्विकारत आहोत. आमच्या मूक मोर्चांची अवघ्या जगाने  दखल घेतली होती.  शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही Maratha Reservation मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू,'' असा विश्वास संभाजीराजेंनी या पत्रात व्यक्त केला आहे. Chatrapati Sambhaji Raje Appeal to Naxal unions

''क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे,'' असा सल्लाही संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवादी संघटनांना दिला आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Fire : शेतातील गोठ्याला आग; शेती साहित्यासह ६ लाखाचे नुकसान

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

SCROLL FOR NEXT