Shardiya Navratri 2022 Saam Tv
धार्मिक

Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रीत आहे 'या' दिवशी शुभ योग, अशा पध्दतीने पूजा केल्यास होतील लाभ !

सर्व नवरात्रीत शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे.

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्री हा शक्ती व उपासनेचा सण आहे. २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. शारदीय नवरात्रीला दुर्गा देवीची पूजा केली जाते. याशिवाय देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.

हिंदू धर्मात मातृशक्तीच्या उपासनेसाठी नवरात्रौत्सव विशेष मानला जातो. हिंदू पंचागानुसार, एका वर्षात चार नवरात्र असतात. दोन गुप्त नवरात्री, एक चैत्र नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र. सर्व नवरात्रीत शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे.

नवरात्रीच्या काळात, देवी दुर्गा हिमालयातून पृथ्वीवर येते आणि नऊ दिवस तिच्या भक्तांच्या घरी विराजमान होते असा समज आहे. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या ९ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. माँ दुर्गेचे भक्त या नऊ दिवसांत उपवास करून माँ शक्तीची आराधना करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, माँ दुर्गा तिच्या भक्तांवर विशेष कृपा करते. अवघ्या काही दिवसात नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार आहे, जाणून घेऊया त्याबद्दल

शारदीय नवरात्र कधी सुरू होणार?

सर्व नवरात्रांमध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचागानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीला शारद नवरात्री असेही म्हटले जाते, कारण या वेळेपासून शरद ऋतूचे आगमन सुरू होते. यावर्षी शारदीय नवरात्री २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दुर्गा विसर्जन आणि विजया दशमीपर्यंत असेल.

शारदीय नवरात्री २०२२ कलश/घटस्थापना मुहूर्त

शारदीय नवरात्री 2022

घटस्थापना मुहूर्त - २६ सप्टेंबर २०२२ सकाळी ०६.११ ते ०७.५१ मिनिट पर्यंत असेल. हा काळ १ तास ४० मिनिटांचा असेल

शारदीय नवरात्री २०२२

दिवस नवरात्र दिवस तिथी पूजा-विधी

२६ सप्टेंबर २०२२ नवरात्री दिवस १ प्रतिपदा देवी शैलपुत्री पूजा घटस्थापना

२७ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया देवी ब्रह्मचारिणी पूजा

२८ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस ३ तृतीया देवी चंद्रघंटा पूजा

२९ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस ४ चतुर्थी देवीकुष्मांडा पूजा

३० सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस ५ पंचमी देवी स्कंदमाता पूजा

०१ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस ६ षष्ठी देवी कात्यायनी पूजा

०२ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस ७ सप्तमी देवी कालरात्री पूजा

०३ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस ८ अष्टमी देवी महागौरी दुर्गा महाअष्टमी पूजा

०४ ऑक्टोबर २०२२ नवरात्र दिवस ९ नवमी देवी सिद्धिदात्री दुर्गा महानवमी पूजा

०५ ऑक्टोबर २०२२ नवरात्र दिवस १० दशमी नवरात्री दुर्गा विसर्जन, विजय दशमी

शारदीय नवरात्रीमध्ये हे करु नका

नवरात्रीचे सात्विक भोजन, स्वच्छता, देवपूजा, भजन-कीर्तन, जागृत, मंत्र, देवीची आरती करा.

कांदा, लसूण, दारू, मांस-मासे सेवन, मारामारी, भांडणे, कलह, कलह, काळे कपडे आणि चामड्याच्या वस्तू घालू नका, दाढी करू नका. केस आणि नखे कापणे

नवरात्रीच्या दिवसानुसार अर्पण करा हे पदार्थ

दिवस पहिला- देवी शैलपुत्री - देशी तूप

दिवस दुसरा- देवी ब्रह्मचारिणी - साखर, पांढरी मिठाई, साखर मिठाई आणि फळे

दिवस तिसरा- देवी चंद्रघंटा - मिठाई आणि खीर

दिवस चौथा - कुष्मांडा देवी- मालपोहे

दिवस पाचवा- देवी स्कंदमाता- केळी (Banana)

दिवस सहावा - देवी कात्यायनी - मध

दिवस सातवा- देवी कालरात्री - गूळ

दिवस आठवा - देवी महागौरी - नारळ

दिवस नववा- देवी सिद्धिदात्री - डाळिंब आणि तीळ

शारदीय नवरात्री २०२२ शुभ योग

पहिला दिवस- देवी शैलपुत्री- सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग

दुसरा दिवस- देवी ब्रह्मचारिणी देवी

तिसरा दिवस - देवी चंद्रघंटा

दिवस चौथा- देवी कुष्मांडा - रवि योग

दिवस पाचवा - देवी स्कंदमाता - सर्वार्थ सिद्धी योग

दिवस सहावा - देवी कात्यायनी- रवि योग

दिवस सातवा- देवी कालरात्री- सर्वार्थ सिद्धी योग

दिवस आठवा - देवी महागौरी- रवि योग

दिवस नववा- सिद्धिदात्री देवी

शारदीय नवरात्री २०२२, घटस्थापनेसाठी पूजा साहित्य

नवरात्री कलश, देवीचा फोटो, ७ प्रकारचे तृणधान्ये, मातीचे भांडे, पवित्र माती, गंगाजल, आंबा किंवा अशोकाची पाने, सुपारी, किसलेले नारळ (Coconut), अक्षता, लाल वस्त्र, फूले

नवरात्रीत माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने फायदा होतो

दिवस नवरात्र दिवस तिथी पूजा-विधी

२६ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा पहिला दिवस प्रतिपदा देवी शैलपुत्रीच्या उपासनेने चंद्रदोषाची समाप्ती होते.

२७ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने मंगल दोष समाप्त होतो.

२८ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस तृतीया देवी चंद्रघंटा पूजेने शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढतो.

२९ सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस चतुर्थी माँ कुष्मांडाची उपासना केल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह बलवान होतो.

३० सप्टेंबर २०२२ नवरात्रीचा दिवस पंचमी देवी स्कंदमातेची उपासना केल्याने बुध ग्रहाचा दोष कमी होतो.

०१ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस सहावा देवी कात्यायनीच्या उपासनेने गुरु ग्रह मजबूत होतो.

०२ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस सातवा कालरात्री देवीच्या उपासनेने शनिदोष समाप्त होतो.

०३ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस आठवा महागौरी देवीची उपासना केल्याने राहुचा वाईट प्रभाव नाहीसा होतो.

०४ ऑक्टोबर २०२२ नवरात्रीचा दिवस नववा देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने केतूचा प्रभाव कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT