Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रौ उत्सवाची 'ही' आहे तारीख, जाणून घ्या त्याचे महत्त्व

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते.
Shardiya Navratri 2022
Shardiya Navratri 2022Saam Tv
Published On

Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. याचा संबंध हा देवीच्या व्रतांशी येतो. हिंदू धर्मात हा नवरात्र उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो.

वसंत नवरात्र चैत्र शुध्द प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते.

यंदा शारदीय नवरात्रौ उत्सव हा २६ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीचे भक्त उपवास, जप, पूजा, भंडारा, जागरण, दांडिया आदींमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. भारतात या सणाचे (Festival) विशेष महत्त्व देखील आहे.

Shardiya Navratri 2022
Palm Reading : आपल्या हातावर बनते आहे हे निशाण जाणून घ्या त्याच्याबद्दल

असे मानले जाते की या नऊ दिवसांत दुर्गादेवीची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतो, त्याला शांती, सुख आणि समृद्धी मिळते कारण देवी त्यांचे सर्व संकट दूर करते. या नवरात्रीच्या काळात, नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र हा हिंदूंमधील सर्वात शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो.

महत्त्व -

हिंदू पंचागानुसार, हा सण शरद ऋतूतील अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि देशभरात, विशेषतः महाराष्ट्र (Maharashtra), बंगाल आणि गुजरातमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे आणि हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र नवरात्रीपासून मानली जाते, तर शारदीय नवरात्र हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

Shardiya Navratri 2022
Pitru Paksha 2022 : पितृपक्षात पिंडदान करायचे आहे ? तर भारतातील 'या' प्रसिध्द ठिकाणी करा, मिळेल पितरांना मोक्ष

नवरात्रीच्या काळात, देवी दुर्गेचे आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आणि शेवटच्या दिवशी पूजा करतात आणि उपवास सोडतात.

पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते ज्याला घटस्थापना देखील म्हणतात. आणि दुर्गा उत्सव पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या शेवटच्या चार दिवसांसाठी म्हणजेच षष्ठीपासून (सिंहावर स्वार होणार्‍या आणि चार दुर्गाशांड असलेल्या मां कात्यायनीला समर्पित) पासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. गुजरातमध्ये नऊ दिवसांच्या उत्सवात गरबा नृत्य खूप प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com