Govatsa dwadashi 2022 Saam Tv
धार्मिक

Govatsa dwadashi 2022: गोवत्स द्वादशी म्हणजे काय? दिवाळीच्या कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Govatsa dwadashi 2022 : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आहे. या काळात सर्वत्र रोषणाई, दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग व फराळाचा सुंगध दरवळत असतो. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

यंदा वसुबारस हा २१ ऑक्टोबरला आहे. यादिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस कधी साजरा केला जातो ?

वसुबारस हा दिवाळी (Diwali) सुरु होण्याच्या एक दिवसाआधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या अदल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचागानुसार वसुबारस हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गाय आणि तिच्या वासराचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो. 'वसु' म्हणजे गाय आणि 'बारस' म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.

हा उत्सव महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये व दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. गुजरातमध्ये याला 'बाग बारस' म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक 'नंदिनी व्रत' म्हणून हा दिवस साजरा करतात.

वसुबारसचे महत्त्व

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होण्यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते.

वसुबारसला काय केले जाते ?

या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य (Health) मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाई मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

Navneet Rana: 'तुझ्यावर मुलासमोर बलात्कार करु...'; नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपर्यंत करता येणार E kyc; उरले फक्त काही दिवस

SCROLL FOR NEXT