Nag Panchami Saam tv
धार्मिक

Nag Panchami 2024: नागपंचमीला 'या' पद्धतीनं पूजा केल्यास कालसर्प दोषापासून व्हाल मुक्त; जाणून घ्या पूजा विधी

Nag Panchami Pooja: श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. यंदा ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. तुमच्या कुंडलीमधील कालसर्प दोष दूर करण्यासाठी जाणून घ्या पूजा करण्याची योग्य पद्धत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदूधर्मानुसार, श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. यंदाचा श्रावण महिन्याला ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. श्रावणात महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. श्रावणातील सोमवारी महादेवाची पूजा आणि जलाभिषेक केला जातो तर श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात अनेक सण साजरा केले जातात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी महादेवाच्या गळ्याभोवती असलेल्या नागदेवतेची पूजा केली जाते.

नागपंचमीला नागदेवताची पूजा केल्यामुळे तुमच्यावरील काल सर्पदोष दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला रात्री स्वप्नामध्ये नाग दिसत असल्यास त्यापासून सुद्धा मुक्ती मिळण्यास मदत होते. पंचांगानुसार, यावर्षी ८ ऑगस्ट रोजी ९ वाजल्यापासून ५६ मिनिटांनी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला सुरुवात होणार असून ते ९ ऑगस्ट रोगी रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी नागपंचमी ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

कालसर्प दोष दूर करण्याची पूजा विधी :

नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. त्यानंतर स्वयंपाक घरामध्ये जाऊन गव्हाचं पीठ मळा आणि त्या पीठापासून नागदेवतेची मूर्ती बनवून घ्या. तयार मुर्तीला हळदी-कुंकू वाहून तुमच्या मुख्य द्वाराच्या बाहेर ठेवा. त्यामुर्तीवर रंगीबीरंगी फुलांचा हार, दूध आणि ज्वारीच्या लाह्या अर्पण करा. त्यानंतर नागदेवतेच्या समोर धूप लावून त्याची मानापासून पूजा करून घ्या. तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असल्यास तुम्ही तिथे जाऊन सुद्धा शिवलिंगाची पूजा करू शकता. सादर पूजा विधी केल्यामुळे तुमच्या कुंडलीमधील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल त्यासोबतच रात्री येणारी नागाची स्वप्न सुद्धा बंद होतील.

श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी 'या' चुका टाळा:

1) नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.

2) नागपंचमीच्या दिवशी स्नान केल्या शिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये.

3) नागपंचमीच्या दिवशी पैशांचा व्यवहार टाळा यामुळे आर्थिक टंचाई होऊ शकते.

4) नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला तळलेल्या नाही तर उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT