खान्देशात शरद पवार गटाला धक्का! बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश; पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनीही दिली साथ

Major Political Shift in Raver: रावेरचे माजी आमदार अरुण पाटील भाजपमध्ये दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठं खिंडार. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अरुण पाटील यांचा प्रवेश.
Major Political Shift in Raver
Major Political Shift in RaverSaam
Published On
Summary
  • रावेरचे माजी आमदार अरुण पाटील भाजपमध्ये दाखल

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठं खिंडार

  • अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अरुण पाटील यांचा प्रवेश

  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी भाजपला मोठी बळकटी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच जळगावातील रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. माजी आमदार अरुण पाटील यांनी आपल्या समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे.

आज मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रावेर येथील माजी आमदार अरूण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केला होता. आज त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून अरूण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप पक्षात प्रवेश केला.

Major Political Shift in Raver
तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

अरूण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपची साथ दिली. यावेळी राष्ट्रवादी (श.प) गटाचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील, निंभोरा गावचे माजी सरपंच सचिन महाले, शिंगाडी गावचे माजी सरपंच महेंद्र बागडे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

Major Political Shift in Raver
वरळी सी लिंकवर थरारक अपघात! चारचाकीने पोलीस हवालदाराला चिरडलं, जागीच मृत्यू

या पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा प्रमुख नंदू महाजन, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप मंत्र्यांनी माजी आमदार अरूण पाटील, तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे रावेरमध्ये भाजपची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

Major Political Shift in Raver
अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com