अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

Major Political Shift: अमरावतीत रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं बळ वाढलं. काँग्रेससह इतर पक्षातील शेकडो महिला कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
Major Political Shift in Amravati
Major Political Shift in AmravatiSaam
Published On
Summary
  • अमरावतीत रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं बळ वाढलं.

  • काँग्रेससह इतर पक्षातील शेकडो महिला कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

  • बडनेरा मतदारसंघात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठं खिंडार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच अमरावतीत राजकीय उलथापालथही पाहायला मिळत आहे. रवि राणा यांचा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचं बळ वाढताना दिसत आहे. काँग्रेससह इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रवि राणा यांची साथ दिली आहे. त्यामुळे अमरावतीत काँग्रेसला खिंडार पडलं असल्याचं बोललं जात आहे.

अमरावतीतील बडनेरा मतदारसंघ म्हणजे रवि राणा यांचा बालेकिल्ला. त्यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीत नुकताच मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश झाला. बडनेरा येथील काँग्रेस पक्षासह इतर अनेक पक्षाच्या शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रवि राणा यांची साथ देण्याचे ठरवलं.

Major Political Shift in Amravati
मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी रवि राणा यांनी प्रत्येक प्रवेश घेणाऱ्या महिलांना, युवा स्वाभिमान पार्टीचा दुपट्टा घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे.

Major Political Shift in Amravati
'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप तीव्र

अमरावती: कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या २२ दिवसांपासून समायोजन करण्याच्या मागणीसाठी संपावर आहेत. सुमारे १५०० कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिंगण सोहळा आयोजित करून अनोखे आंदोलन केले. या वेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सरकारने तात्काळ समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचा संप सुरूच राहील.

Major Political Shift in Amravati
तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com