ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरफड आरोग्यासह केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत जे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी मदत करतात.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होते.
दररोज रात्री कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
दररोज चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने पिंप्लस कमी होतात.
दररोज रात्री कोरफडीचे जेल काही वेळ लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि चेहरा चमकदार होतो.
कोरफडीचे जेल ऑयली आणि ड्राय दोन्ही स्कीनसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वता हायड्रेट राहते.
कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करा. काहींना यामुळे अॅलर्जी होऊ शकते, तसेच ज्यांना आधीच कोणतीही त्वचेशी संबधित समस्या असेल त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.