Ganesh Chaturthi 2022  Saam Tv
धार्मिक

Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या या अवतारांबद्दल माहितेय का ? केला होता असूरांचा वध

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : सध्या घरोघरी बाप्पा विराजमान आहेत. प्रत्येक घरातून बाप्पाच्या जयघोष सुरू आहे. श्रीगणेशाच्या महतीबद्दल आपल्या सगळ्यांना माहितेय परंतु, गणेशाच्या या आठ नावाबद्दल माहितेय का ?

जाणून घेऊया गणपतीच्या (Ganpati) या आठ नावामागची कथा. त्यातील प्रत्येक रुपाचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार श्री गणेशाने आठ प्रमुख अवतार घेतले होते. प्रत्येक अवताराचे स्वतःचे महत्त्व असते. जाणून घ्या या नावांबद्दल

एकदंत : गणपतीला एकदंत असेही म्हणतात, कारण परशुरामाशी झालेल्या युद्धात त्याचा एक दात तुटला होता. मात्र, मदासुराला मारता यावे म्हणून त्याने एकदंत अवतार घेतला, असेही सांगितले जाते. यावेळी त्याचे वाहन उंदीरही त्याच्यासोबत होता.

वक्रतुंड : वक्रतुंड म्हणजे ज्याची सोंड वक्र आहे. मत्सरासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री गणेशाने वक्रतुंडाचा अवतार घेतला. या अवतारात श्रीगणेशाचे (Ganesh) वाहन सिंह होते.

विकट : गणपतीला विकट म्हटले जाते कारण तो कठीण परिस्थितीतही यशस्वी होण्याची प्रेरणा देतो. त्याने कामसूरला हरवता यावे म्हणून भयंकर अवतारही घेतला होता. या अवतारात वाहन मोर होते.

Ganpati Bappa Morya

लंबोदर : लंबोदर म्हणजे मोठे उदर असलेला. अजिंक्य क्रोधासुरचा पराभव करण्यासाठी गणेशाने लंबोदराचा अवतार घेतला होता असे म्हणतात.

महोदर : मोहासुरला मारण्यासाठी गणपतीने महोदरचा अवतार घेतला. यादरम्यानही त्याने उंदरावर बसून त्याचा वध केला होता.

विघ्नराज : पौराणिक कथेनुसार देवांवरील अडथळे दूर करण्यासाठी श्री गणेशाने विघ्नराजाचा अवतार घेतला. या अवतारात त्याने ममतासुराचा पराभव केला.

गजानन : गणपतीला गजानन हे नाव देखील पडले कारण त्यांचा चेहरा गजाचा आहे. लोभासुराच्या अत्याचारातून जनतेला मुक्त करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतल्याचे सांगितले जाते.

धुम्रवर्ण: गणेशजींचा धुम्रवर्ण अवतार, ज्यामध्ये त्यांनी उंदराचा अवतार घेतला होता. अहंतासुरला मारण्यासाठी त्याने धुम्रवर्णाचा अवतार धारण केल्याचे सांगितले जाते. या अवतारात गणेशाचा रंग धुरासारखा होता, म्हणून हे त्याचे नाव धुम्रवर्ण पडले.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT