वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंजुरी; विदर्भातील 8 जिल्ह्यांना फायदा होणार

Wainganga–Nalganga River Linking Project: विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये सिंचनाला चालना देण्यासाठी आणि दुष्काळाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने ९५,००० कोटी रुपयांच्या वैनगंगा-नलगंगा नदी जोडणी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या मेगा पायाभूत सुविधा योजनेमुळे या प्रदेशातील शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याची समस्या सुटणार आहे.
Wainganga–Nalganga River Linking Project
Chief Minister Devendra Fadnavis announces approval of the ₹95,000 crore Wainganga–Nalganga river linking project set to benefit eight districts in Vidarbha.saam tv
Published On
Summary
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला ९५ हजार कोटींची मंजुरी.

  • पूर्व विदर्भातील पुराचे पाणी पश्चिम विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात वळवले जाणार.

  • ८ जिल्ह्यांना सिंचन, पिण्याचे व औद्योगिक पाण्याचा मोठा लाभ.

विदर्भाच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढणारा अत्यंत महत्त्वाचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पला मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९५ हजार कोटींच्या या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात घेतलेला निर्णय विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. पूर्व विदर्भात भरपूर पाऊस पडतो. तर पश्चिम विदर्भात पावसाची अनिश्चितता आहे.

Wainganga–Nalganga River Linking Project
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; 'या' दिवशी होणार घोषणा

वैनगंगा नदीचे पाणी पुराच्या स्वरुपात वाहून जाते. हे पाणी कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या पट्ट्यात वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम विदर्भातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला जाईल. या प्रकल्पामुळे विदर्भातील घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

Wainganga–Nalganga River Linking Project
Onion Farmer Protest: 'कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या'; कांद्याचे दर घसरले, शेतकरी रस्त्यावर

8 जिल्ह्यांना फायदा होणार

दरम्यान या प्रकल्पामुळे 388.28 कि.मी. लांबीचा कालवा तयार होणार आहे. यात विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यातून कालवा जाणार आहे. या प्रकल्पाचा नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह भंडारा या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पात एकूण 20.49 कि. मी.च्या 13 बोगद्यांचा समावेश आहे. असून तब्बल 4 लाख 4 हजार 281 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळेल. प्रकल्पातून 1,804.78 दलघमी म्हणजेच 64 टीएमसी कृषि व औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार आहे.

पुढील 10 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

प्रकल्पग्रस्त 39 गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार

प्रकल्पास आवश्यक पर्यावरण, वन, केंद्रीय जल आयोग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण यांच्या मान्यता घेण्यात येणार

प्रकल्पाचे स्वरूप आणि व्याप्ती

लांबी : सुमारे ४२६.५४ किलोमीटरचा मुख्य कालवा आणि पाईपलाईनद्वारे पाणी नेले जाईल.

बोगदे : पाणी प्रवासात २०.४९ कि.मी. लांबीचे १३ बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना फायदा: नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम, भंडारा

पुनर्वसन आराखडा : प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ३९ गावांच्या पुनर्वसनासाठी विशेष आराखडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com